मुंबईतील कांदिवलीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मराठी भाषेत बोला' या करता परप्रांतीयांसाठी मराठी पाठशाला घेण्यात आली. 'घाबरून नका, चला मराठी शिकुया' असं म्हणत मुंबईतील विविध वॅार्डमध्ये जाऊन मराठी पाठशाळा भरवली जाणार आहे. कांदिवली भागातील उत्तर भारतीय नागरिकांना मराठी शिकण्यासाठी मराठी सन्मानासाठी एक मंच तयार करून देण्यात आला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी हिंदीतून भाषण केलं.
advertisement
कोरोना काळात अनेकांना आपल्या घरी परतायचे होते, तेव्हा उत्तर भारतीयांचे हाल झाले. अनेक जण रस्त्याने पायी चालत गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झालाा. तेव्हा केंद्राने तुमची चिंता केली नाही तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तुमची मदत केली. सर्वांना आपलं समजणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना बिहार युपीत गावात प्रवेश दिला जात नव्हता. मुंबई अनेकांची कर्मभूमी आहे. मातृभाषा यायलाच हवी परंतु स्थानिक राज भाषा यायलाच पाहिजे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
'मनसे भाजपची बी टीम'
'मनसे ही भाजपची बी टीम आहे. ती सेटिंगमध्ये कामं करते. तू मारल्या सारखं करं, मी रडल्यासारखं दाखवतात आणि पाठीमागे सहकार्य करतात, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मनसेवर टीका केली.
तसंच, 'उत्तर भारतीयांसाठी मुंबईतील सर्वभागांत मराठी पाठशाला भरवण्यात येणार आहे, अशी घोषणाही आदित्य ठाकरेंनी केली.
राज ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे
विशेष म्हणजे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून मराठीचा अजेंडा पुन्हा हाती घेतला. बँकेत मराठी भाषा बोललीच पाहिजे, असं म्हणत मनसेसैनिकांनी खळ-खट्याकचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्यभरात मनसेसैनिकांनी बँकांमध्ये घुसून कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं होतं. एवढंच नाहीतर मुंबईत ठिकठिकाणी शॉपिंग मॉल असेल, टेलिफोन कंपन्या असतील मराठीतून बोललं पाहिजे, असा आग्रह धरत खळ-खट्याक कार्यक्रम राबवला आहे. एकीकडे मनसेच्या मराठी मोहिमेला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच परप्रांतीयांना मराठीतून बोलता यावं यासाठी मराठी पाठशाला सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने येण्याची चिन्ह आहे.