मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यूज 18लोकमतचे संपादक मंदार फणसे यांनी 'मोदी @75' या कॉफी टेबल बुकची एक प्रत दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत खास कॉफी टेबल बुकमध्ये पंतप्रधानांच्या उल्लेखनीय प्रवासातील 75 निर्णायक क्षण एकत्र आणले आहेत. ‘Modi@75’ हे पुस्तक दृढनिश्चय, लवचिकता आणि दूरदृष्टीने आकार घेतलेल्या जीवनाचे दृश्य आणि कथात्मक वर्णन आहे.
advertisement
पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधून नेटवर्क18नं 'मोदी @75' हे कॉफी टेबल बुक तयार केलं आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात आलं होतं. या पुस्तकात पंतप्रधान मोदींच्या जीवनातील 75 महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
हे कॉफी टेबल पाच भागांमध्ये विभागण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींचं सुरुवातीचं आयुष्य ते जागतीक नेते असा थक्क करणारा प्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनेक दिग्गजांनी या पुस्तकात लेख लिहिले आहेत.या पुस्तकातून मोदींच्या जीवनातील विविध महत्वाचे पैलू उलगडण्यात आले आहेत.
पुस्तक पाच विभागांमध्ये
नरेंद्र मोदी यांचे सुरुवातीचे वर्ष, सार्वजनिक जीवनात त्यांचा उदय, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ, भारताचे पंतप्रधान आणि जागतिक राजकारणी म्हणून त्यांची भूमिका आणि त्यांच्या जागतिक राजनैतिकतेवरचे प्रतिबिंब.
या पुस्तकात दुर्मिळ छायाचित्रं, पत्रं आणि स्मृतीचिन्हं आहेत, जी पंतप्रधान मोदींच्या जीवनातील कमी ज्ञात पैलूंवर प्रकाश टाकतात. यासोबतच त्यांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या ऐतिहासिक क्षणांचाही समावेश आहे.
जगभरातील नामांकित व्यक्तींनी दिलेले वैयक्तिक विचार आणि अनुभव या पुस्तकाला आणखी समृद्ध करतात. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांचे मित्र "नरेंद्र" यांना एक वैयक्तिक पत्र लिहिले आहे.
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांचे विशेष योगदान आहे. तसेच भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींनी समृद्ध भारतासाठी मोदींच्या दूरदृष्टीबद्दल लिहिले आहे. या सर्व विचारांमधून पंतप्रधानांचे जागतिक संबंध आणि त्यांचा बहुआयामी प्रभाव अधोरेखित होतो.