जादा फेऱ्यांचे नियोजन कसे असेल?
उन्हाळ्याच्या सुट्टीत लांब पल्ल्याच्या मार्गांवर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या शालेय फेऱ्या तात्पुरत्या रद्द करून त्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडण्यात येणार आहेत. एसटीच्या 764 जादा फेऱ्या राज्यभरात विविध मार्गांवर धावतील. यामुळे दररोज साधारण 2.50 लाख किलोमीटरचे अंतर कापले जाणार आहे.
HSRP नंबर प्लेटला तात्पुरता ब्रेक, पुण्यात भलताच गोंधळ, पण कारण काय?
advertisement
आरक्षणासाठी सुविधा
प्रवाशांच्या सोयीसाठी या सर्व जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रवासी खालील माध्यमांतून सहज आरक्षण करू शकतात:
1) वेबसाईट: www.msrtc.maharashtra.gov.in
2) आरक्षण पोर्टल: https://npublic.msrtcors.com/
3) बसस्थानक आरक्षण केंद्रे: सर्व प्रमुख बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रावर
प्रवाशांसाठी सूचना
एसटी महामंडळाने प्रवाशांना विनंती केली आहे की, प्रवासाचे नियोजन आधीच करावे आणि आगाऊ आरक्षण करून निश्चित सीट बुक करावी. तसेच अधिकृत संकेतस्थळ आणि अँपद्वारेच तिकीट आरक्षित करावे, जेणेकरून कोणत्याही फसवणुकीपासून वाचता येईल.
सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी एसटी
उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित आणि आरामदायी प्रवासात लुटण्यासाठी एसटीची अतिरिक्त बस सेवा एक उत्तम पर्याय आहे. वेळेवर आणि विनासायास पोहोचण्यासाठी आजच आगाऊ आरक्षण करा, असं आवाहन करण्यात आलंय.