TRENDING:

'मुंबई कस्टम विभाग'मध्ये नोकरभरती, शेवटची तारीख आली जवळ; पटापट करा अर्ज

Last Updated:

भारतीय सीमा शुल्क विभागाच्या अंतर्गत येणार्‍या मुंबई कस्टम विभाग येथे भरती सुरू आहे. या भरती संदर्भात अलीकडेच अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतीय सीमा शुल्क विभाग (Indian Custom Department) यांच्या अंतर्गत येणार्‍या मुंबई कस्टम विभाग (Mumbai Custom Department) येथे भरती सुरू आहे. या भरती संदर्भात अलीकडेच अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबईच्या सीमा शुल्क विभागामध्ये, 'कॅन्टिन अटेंडंट' पदासाठी एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. दहावी पास उमेदवारांसाठी मुंबईमध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
'मुंबई कस्टम विभाग'मध्ये नोकरभरती, शेवटची तारीख आली जवळ; पटापट करा अर्ज
'मुंबई कस्टम विभाग'मध्ये नोकरभरती, शेवटची तारीख आली जवळ; पटापट करा अर्ज
advertisement

'कॅन्टिन अटेंडंट' पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. 23 नोव्हेंबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन, आणि अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

अर्जासाठी अंतिम तारीख

भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागांतर्गत मुंबई सीमाशुल्क विभागामध्ये 'कॅन्टिन अटेंडंट' पदासाठीची 30 ऑक्टोबरपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण 22 पदांमध्ये जातनिहाय पद्धतीने नोकरभरती केली जाणार आहे. खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती- जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बळ घटकातील उमेदवार यांच्यामध्येच वर्गनिहाय पदे जाणार आहेत. वयोमर्यादा किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 25 वर्षे आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना 40 वर्षांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने नाही तर, ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे.

advertisement

कोणत्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा?

अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरातीच्या PDF वर एक नजर टाकायची आहे. जाहिरातीच्या PDF ची लिंक बातमीमध्ये देण्यात आली आहे. शिवाय, अर्ज सुद्धा बातमीमध्ये देण्यात आला आहे. अर्जाची लिंक इच्छुक उमेदवारांसाठी देण्यात आली आहे. टपालच्या माध्यमातून अर्जदारांनी आपला अर्ज सादर करायचा आहे. Assistant Commissioner of Customs (Personnel & Establishment Section), 2nd Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai - 400001 या पत्त्यावर अर्जदारांना अर्ज पाठवायचा आहे.

advertisement

अर्ज कसा पाठवायचा?

उमेदवाराने मान्यता प्राप्त मंडळातून दहावी (10वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, उच्च शिक्षित उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल. अर्ज निर्दिष्ट स्वरूपात (Prescribed Format) भरावा. आवश्यक कागदपत्रे (10वी मार्कशिट आणि प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, जन्मतारीख पुरावा) स्वतःच्या स्वाक्षरीने प्रमाणित (Self-attested) करून जोडावीत.

advertisement

  • लिफाफ्यावर स्पष्टपणे लिहावे- "APPLICATION FOR THE POST OF CANTEEN ATTENDANT"
  • अर्ज टपालाद्वारे खालील पत्त्यावर पाठवावा- The Assistant Commissioner of Customs (Personnel & Establishment Section), 2nd Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai - 400001.
  • अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 30 दिवसांच्या आतच प्राप्त व्हावा. अपूर्ण किंवा उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन, रेल्वेत विकले पेन, अंधत्वावर मात करत मिळवली नोकरी
सर्व पहा

निवड झालेल्या उमेदवाराला मुंबईमध्ये नोकरी करण्याची संधी मिळेल. 18,000 ते 56,900 पर्यंत पगार मिळेल. केंद्र सरकारच्या अखत्यारित ही नोकरी असेल.

मराठी बातम्या/मुंबई/
'मुंबई कस्टम विभाग'मध्ये नोकरभरती, शेवटची तारीख आली जवळ; पटापट करा अर्ज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल