महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काही पूल अत्यंत जुनाट आणि खराब अवस्थेत आहेत. यातील काही पूलांचे दुरुस्तीचे काम सुरू आहेत, परंतु काहींच्या दुरुस्तीच्या कामांना थोडा वेळ लागणार असल्याने मिरवणुकांदरम्यान त्या पूलांवरून जाणे धोकादायक ठरू शकते. महापालिका आणि मुंबई पोलिसांच्या वतीने वेळोवेळी सूचना आणि मार्गदर्शन दिले जाते, त्यांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
advertisement
मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर रेल्वे उड्डाणपूल, करी रोड रेल्वे उड्डाणपूल, आर्थर रोड रेल्वे उड्डाणपूल किंवा चिंचपोकळी रेल्वे उड्डाणपूल, भायखळा रेल्वे उड्डाणपूल या पूलांवरून मिरवणूक नेताना भाविकांनी अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील धोकादायक उड्डाणपूलांमध्ये मरीन लाइन्स रेल्वे उड्डाणपूल, सँडहर्स्ट रोड रेल्वे उड्डाणपूल ग्रँट रोड आणि चर्नी रोड दरम्यान, फ्रेंच रेल्वे उड्डाणपूल (ग्रँट रोड आणि चर्नी रोड दरम्यान) तसेच केनडी रेल्वे उड्डाणपूल यांचा समावेश आहे तसेच फॉकलंड रेल्वे उड्डाणपूल (ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रलच्या मध्ये), महालक्ष्मी रेल्वे उड्डाणपूल, प्रभादेवी-कॅरोल रेल्वे उड्डाणपूल आणि दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे उड्डाणपूल यावरून जाणारे मार्ग देखील धोकादायक आहेत.
महापालिका प्रशासनाने विशेष सूचित केले आहे की, गणेशोत्सवाच्या काळात या पूलांवरून मिरवणूक घेताना लोकांनी गर्दी टाळावी, एकमेकांशी सुरक्षित अंतर ठेवावे आणि पोलिसांच्या किंवा महापालिकेच्या कर्मचारी यांच्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात. पूलांच्या आसपास कोणतीही अनधिकृत उभ्या वस्तू ठेवू नयेत आणि मिरवणूक सुरक्षित मार्गानेच पार पाडावी.
याव्यतिरिक्त, महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पूलावरून जाताना लहान मुलं आणि वृद्ध नागरिक विशेष काळजी घेतील. गर्दीच्या वेळी धक्कामुक्की होऊ नये यासाठी नागरिकांनी संयम राखावा आणि मिरवणुकीत सहभागी असताना फक्त नियमीत मार्ग वापरावा.