TRENDING:

Mumbai News: मुंबईमध्ये 'रॅपिडो' बंद होणार? गुन्हा दाखल, आरटीओने केली कारवाई; नेमकं कारण काय?

Last Updated:

Mumbai Rapido Drivers: राज्य सरकार किंवा आरटीओकडून म्हणजेच प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांची कोणतीही परवानगी न घेता शहरात थेट सुरू असलेल्या रॅपिडो कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईमध्ये आरटीओकडून रॅपिडो ड्रायव्हर्सवर धडक कारवाई केली जात आहे. राज्य सरकार किंवा आरटीओकडून म्हणजेच प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांची कोणतीही परवानगी न घेता शहरात थेट सुरू असलेल्या रॅपिडो कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. रॅपिडोचे देशभरात लाखो युजर्स आहेत. अनेक तरूण- तरूणी रॅपिडोचा वापर करत असतात. खिशाला परवडणाऱ्या पैशांत ही कंपनी प्रवाशांना आपल्या ठिकाणी पोहोचवते. पण आता या कंपनीलाच राज्य सरकारने चांगलाच दणका दिला आहे.
Mumbai News: मुंबईमध्ये 'रॅपिडो' बंद होणार? गुन्हा दाखल, आरटीओने केली कारवाई; नेमकं कारण काय?
Mumbai News: मुंबईमध्ये 'रॅपिडो' बंद होणार? गुन्हा दाखल, आरटीओने केली कारवाई; नेमकं कारण काय?
advertisement

मुंबईसह उपनगरामध्ये अनेक ठिकाणी रॅपिडो गाड्यांचा वापर केला जातो. गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वत्र रॅपिडो वाहतूक सेवा सुरू आहे. यामध्ये दुचाकी, रिक्षा आणि चारचाकीच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा पुरवली जाते आहे. आता अशातच प्रवाशांना सुविधा पुरवणाऱ्या ह्या कंपनीला राज्य सरकारने आणि आरटीओने चांगलाच दणका दिला आहे. विनापरवाना सुरू असलेल्या रॅपिडो कंपनीच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. मुंबई उपनगरांत आरटीओने या धडक कारवाईला सुरूवात केली आहे. नेहरूनगर आणि पंतनगर पोलिस ठाण्यामध्ये रॅपिडो कंपनीच्या डायरेक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

कुर्ला नेहरूनगर परिसरात 2 डिसेंबर रोजी, तर घाटकोपर परिसरात 3 डिसेंबर रोजी आरटीओनेही बेधडक कारवाई केली आहे. घाटकोपरच्या लक्ष्मीनगर परिसरात आणि कुर्ला नेहरूनगर एसटी डेपो परिसरात आरटीओ अधिकाऱ्यांनी रॅपिडो बुक करत कारवाई केली. सरकारने अलीकडेच, ई- बाईक धोरण जाहीर केली. त्याच आधारावर मुंबईसह परिसरात आरटीओकडून कारवाई केली जात आहे. अवैध बाईकमुळे अनेकदा निर्दोष प्रवाशांना किंवा चालकाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. या अवैध गाड्या मुंबईमध्ये सर्रास सुरू असल्यामुळे आरटीओ विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे. बेकायदेशीर गाडी चालवणाऱ्यांवर आरटीओ सध्या बेधडक कारवाई करत आहे.

advertisement

जितक्या बाइक बेकायदेशीर वाहतूक करताना आढळतील, तितके गुन्हे संबंधित चालकावर न दाखल करता ती बाइक ज्या ॲप आधारित कंपनीची आहे. त्या कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सज्जड दम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. त्याच आधारावर 2 डिसेंबर रोजी रॅपिडो ॲप कंपनीविरोधात आरटीओने मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 'रॅपिडो' कंपनीवर मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 66 (1) आणि 192 अन्वये बेकायदेशीररीत्या 'बाइक टॅक्सी' चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तब्बल 1,00,00,000 रुपयांचा गांजा पकडला, पोलीस त्याच पुढे काय करतात? Video
सर्व पहा

मुंबई आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत रॅपिडो म्हणजे रोपन ट्रान्सपोर्ट कंपनी 'राइड शेअरिंगच्या नावाखाली प्रवाशांची वाहतूक करत असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे कंपनीने प्रवासासाठी वापरलेली वाहने ही खासगी मालकीची होती. मोटार वाहन कायद्यानुसार, खासगी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही, कंपनीने नफा मिळवण्याच्या उद्देशाने या नियमांचे उल्लंघन केले.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मुंबईमध्ये 'रॅपिडो' बंद होणार? गुन्हा दाखल, आरटीओने केली कारवाई; नेमकं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल