करुणा गोकर्ण या गेल्या तीन दशकांपासून कॉलेजमध्ये बायोलॉजी शिकवत आणि विविध शैक्षणिक व प्रशासनिक पदे सांभाळत आहेत. महाविद्यालयाच्या 156 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा महिला प्राचार्य नियुक्त झाली आहे. 55 वर्षांच्या करुणा गोकर्ण यांना मे 2025 मध्ये प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्त केले होते. आता बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने त्यांची स्थायी प्राचार्यपदी नियुक्ती अधिकृत केली आहे, आणि ही नियुक्ती राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे.
advertisement
भुयारी मेट्रोचा ‘तो’ निर्णय वादात, मुंबईकरांना करावा लागणार खासगी बसचा प्रवास, कारण काय?
करुणा गोकर्ण यांनी सांगितले की, कॉलेजमध्ये काही मुख्य आव्हाने आहेत. त्यात प्रमुख म्हणजे शासकीय पातळीवर मंजूर केलेल्या शिक्षक पदांची कमतरता, तसेच फॅकल्टीमध्ये सतत बदल होणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्थिर शिक्षण मिळणे कठीण होते. त्यांच्या पुढील योजना म्हणजे सेंट झेवियर्सला विद्यापीठाचे दर्जा मिळवून देणे, ज्यामुळे कॉलेजमध्ये शैक्षणिक व संशोधन कार्याला मोठे प्रोत्साहन मिळेल. तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम आणि संशोधनाच्या संधी वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या तीन दशके करुणा गोकर्ण यांनी कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जैवशास्त्राविषयी रुची निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांचा अनुभव आणि ज्ञान आता कॉलेजच्या नेतृत्वात दिसून येईल, ज्यामुळे महिला नेतृत्वाचा नवीन अध्याय सेंट झेवियर्सच्या इतिहासात सुरू झाला आहे.