मालाडच्या मालवणी परिसरातील कच्चा रोड आडवा पट्टाजवळ ही हत्येची घटना घडली आहे. 56 वर्षीय सिराज नाईक आणि 52 वर्षीय मुमताज मालाडचे रहिवासी आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सिराज यांचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयावरून सिराज यांनी आपल्या पत्नीची काल दगडाने ठेचून हत्या केली आहे. चारित्र्याच्या रागावरून सिराज यांनी काल (गुरूवार- 20 नोव्हेंबर) सकाळी मालाडमध्ये राहत्या घरी आपल्या पत्नीची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी सिराजवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. सिराजने पत्नीची हत्या केल्यानंतर मालवणी पोलिसांकडे स्वत:हून सरेंडर झाला आहे.
advertisement
मालवणी पोलिस सध्या हत्येचे सर्व कंगोरे तपासून पाहत आहेत. हत्येमागील कारणाचा तपास पोलिस करीत आहे. या संदर्भात आरोपीकडून मालवणी पोलीस अधिक तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मालाडच्या मालवणी परिसरात राहणार्या एका 52 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने दगडीने ठेचून निर्घृणपणे हत्या केली. पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपी पती सिराज अहमद आदम नाईक (57) याला मालवणी पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. सिराज नाईकने केलेल्या हत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास मालवणी परिसरात घटना घडली.
ज्या परिसरात नाईक कुटुंबीय राहत होते, त्याच परिसरात त्यांनी आपल्या पत्नीची हत्या केली आहे. सिराज पत्नीच्या चारित्र्यावरुन संशय घेत होता. तिचे इतर पुरुषांसोबत संबंध असल्याचा आरोप करुन तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. या कारणावरुन त्यांच्यात नेहमीच वाद होत होते. बुधवारी रात्री सिराज आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. त्याच रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीची हत्या करून टाकली. हत्येनंतर सिराज सकाळी मालवणी पोलिस स्थानकात येऊन गुन्हा कबूल केला. गुन्हा कबूल केल्यानंतर घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले, तात्काळ सिराजच्या पत्नीला पोलिसांनी शताब्दी रूग्णालयात दाखल केले.
तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पत्नीची हत्या केल्यामुळे मालवणी पोलिसांनी सिराजविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. पोलिस घटनेचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सिराज नाईकने पत्नीची झोपेत असतानाच हत्या केली. ही हत्या SRA प्रकल्पांतर्गत मिळणाऱ्या फ्लॅटसाठी झालेल्या वादातून घडल्याचे समोर आले आहे. नाईक पत्नी आणि तीन मुलांसोबत मालवणी परिसरात राहत होता. SRA प्रकल्पांतर्गत फ्लॅट मिळवण्यासाठी बिल्डरला 9.70 लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने पत्नीला सांगितले होते. मात्र मुमताजने त्याला विरोध केला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादानंतर मुमताज झोपायला गेली. त्यानंतर आरोपीने एक जड दगड आणून तिच्या डोक्यात वार केला. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर सिराज नाईक थेट मालवणी पोलीस स्टेशनमध्ये आला आणि गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केले.
