क्रिस्पी पोटॅटो ट्रेंगल साहित्य
उकडलेले बटाटे – 4 मध्यम
कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचे पीठ – 2 टेबलस्पून
हिरवी मिरची-आलं पेस्ट – 1 टीस्पून
लाल तिखट – 1 टीस्पून
हळद – ¼ टीस्पून
मीठ – चवीनुसार
कोथिंबीर – 2 टेबलस्पून
चिली फ्लेक्स
ऑरगॅनो
तेल – शॅलो फ्रायसाठी
Kimchi Recipe : देशी जेवणाला द्या कोरियन टच, कोशिंबीरीऐवजी बनवा किमची! 20 मिनिटांत होईल तयार
advertisement
क्रिस्पी पोटॅटो ट्रेंगल कृती
उकडलेले बटाटे मॅश करून घ्या. त्यात कॉर्नफ्लोअर, तिखट, हळद, मीठ, चिली फ्लेक्स, ऑरगॅनो आणि कोथिंबीर घालून छान मिसळा.
हे मिश्रण एकसारखे मळून घ्या. एका ताटात किंवा पाटावर हे मिश्रण हलकेसे थापून घ्या आणि त्रिकोणी आकाराचे तुकडे कापा. तव्यावर थोडे तेल घालून हे ट्रेंगल दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा. गरमागरम ट्रेंगल सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.
फक्त नाश्त्यालाच नाही तर आपण कधीही हे क्रिस्पी पोटॅटो ट्रेंगल बनवू शकतो आणि सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकतो.





