देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल
विकास बेद्रे या तरुणाने तात्काळ डॉक्टर मैत्रिण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली. झालं असं की, एक गर्भवती महिला बुधवारी रात्री 12.40 च्या सुमारास गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. त्यावेळी अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. डब्ब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणाने लोकलची इम्रर्जन्सी चैन ओढली.
advertisement
महिलेने प्लॅटफॉर्मवर बाळाला जन्म दिला
प्रवाशांनी तात्काळ महिलेला राम मंदिर परिसरात उतरवलं अन् मदतीचा हात पुढे केला. विकास बेद्रे याने तात्काळ डॉ. देविका देशमुख यांना व्हिडीओ कॉल केला अन् झालेली घटना सांगितली. डॉ. देविका देशमुख यांनी तात्काळ मार्गदर्शन केलं. अन् प्रसृतीची संपूर्ण प्रकिर्या सांगितली. त्यानंतर डॉ. देविका देशमुख यांनी विकास बेद्रे यांना मार्गदर्शन केलं अन् महिलेने बाळाला जन्म दिला.
पाहा Video
आई आणि बाळ दोघंही सुखरूप
दरम्यान, घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने आई आणि बाळाला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर आता आई आणि बाळ दोघंही सुखरूप असल्याचं पहायला मिळतंय. विकास बेद्रे याने दाखवलेल्या धाडसामुळे सध्या त्याचं कौतुक होताना पहायला मिळतंय.