आज प्रजासत्ताक दिन असल्याने मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आज सकाळी 8 वाजले तरी मुंबईतील लोकल सेवा सुरूच झाली नव्हती. त्यामुळे सर्वच रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. उशिरापर्यंत रेल्वेकडून कोणतीही सूचना न मिळाल्याने प्रवाशांत संभ्रम होता. मात्र, गोंधळानंतर रेल्वेकडून मेगाब्लॉकचा कालावधी वाढवत असल्याची घोषणा करण्यात आली.
advertisement
ST bus Fare Hike : एसटीचा प्रवास महागला, दरवाढीनंतर छत्रपती संभाजीनगर ते पुणे तिकीट किती?
मध्य रेल्वेनं आधीच केली होती ब्लॉकची घोषणा
मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी ) ते मस्जिद दरम्यान 25, 26, 27 जानेवारी आणि 1, 2, 3 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक गेण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेने केली होती. या ब्लॉकच्या काळात मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन धीम्या, जलद मार्गावरील लोकल सीएसएमटी ते भायखळा दरम्यान उपलब्ध नसतील, असंही मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं होतं. तसेच मुख्य मार्गावरील भायखळा-सीएसएमटी स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नसल्याचीही माहिती दिली होती. परंतु, पहाटे पाचला संपणारा ब्लॉक लांबला आणि 8 नंतरही ब्लॉक कालावधी वाढवण्यात आला आहे.
मरीन ते वांद्रे 15 मिनिटांत, प्रवास होणार सुस्साट, सरकारकडून खास भेट
पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे हाल
पश्चिम रेल्वे मार्गावर देखील माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शुक्रवारी रात्रीपासून रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक रविवारी पहाटे संपणार होता. परंतु, त्याचे पडसाद उशिरापर्यंत दिसत होते. पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. तसेच लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या.