मरीन ते वांद्रे 15 मिनिटांत, प्रवास होणार सुस्साट, सरकारकडून खास भेट

Last Updated:

Mumbai Coastal Road: मुंबईकरांना प्रजासत्ताकदिनी खास भेट मिळणार आहे. मरीन ड्राइव्ह ते बांद्रा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

प्रजासत्ताक दिनी मुंबईकरांना खास भेट, सोमवारपासून खुला होणार मरीन ड्राइव्ह ते बांद्रा रस्ता
प्रजासत्ताक दिनी मुंबईकरांना खास भेट, सोमवारपासून खुला होणार मरीन ड्राइव्ह ते बांद्रा रस्ता
मुंबई: प्रजासत्ताक दिनी मुंबईकरांना खास भेट मिळणार आहे. मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यानच्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. कोस्टल रोडचा शेवटचा टप्पा आणि त्याच्या तीन इंटरचेंजचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच, रविवारी 26 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या पुलाचे लोकार्पण झाल्यानंतर वाहतुकीवरील ताण निश्चित कमी होणार आहे. शिवाय मुंबईकरांचा प्रवास ही सुलभ होण्यास मदत होईल.
सोमवारपासून वाहतूक सुरू
या पुलाचे लोकार्पण जरी 26 जानेवारीला होणार असले तरी प्रत्यक्ष वाहतूकीला दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. या इंटरचेंजमुळे वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन या ठिकाणांवरील लोकांना मदत होईल. त्यासोबतच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन या भागातील प्रवाशांना कोस्टल रोडवर ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या 3 आंतरमार्गिकांचे लोकार्पण देखील याचवेळी होणार आहे.
advertisement
सोमवारी 27 जानेवारी पासून या सर्व मार्गिंकावरून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होणार आहे. मरीन ड्राइव्ह ते वांद्रेकडे जाणारा हा रस्ता सोमवारपासून वाहनांसाठी खुला होईल. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा त्याचा मार्ग आधीच सुरू करण्यात आला आहे. हा मार्ग दररोज सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत खुला असेल. 12 मार्च ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान, 50 लाख वाहने कोस्टल रोडवरून गेली आहेत. 10.58 किमी लांबीचा हा मार्ग वरळी-वांद्रे-सी लिंकशी जोडलेला आहे. या मार्गावरून दररोज 18 ते 20 हजार वाहने जातात. गेल्या वर्षी 12 सप्टेंबर रोजी या मार्गाचे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते.
advertisement
या मार्गामुळे मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत 15 मिनिटांत पोहोचता येणार आहे. या प्रकल्पामुळे 70 टक्के वेळ आणि 34 टक्के इंधनाची बचत होईल. लोकार्पण होणाऱ्या पुलाची लांबी 827 मीटर इतकी आहे. यामध्ये समुद्रावर असलेली लांबी 699 मीटर तर पोहोच रस्ता 128 मीटर यांचा समावेश आहे. हा पूल बांधण्यासाठी सुमारे 2400 मेट्रिक टन वजनाचा बो आर्च स्ट्रिंग गर्डर वापरला गेला. याची लांबी 143 मीटर तर रुंदी 27 मीटर आणि उंची 31 मीटर इतकी आहे.
advertisement
वाहतूककोंडी कमी होणार
या प्रकल्पामुळे लवकरच वाहनचालकांना मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्रयापर्यंत जाता येणार आहे. कोस्टल रोड सी-लिंकला वरळी येथे महाकाय गर्डरने जोडले गेल्याने वांद्रयाहून दक्षिण मुंबईत प्रवास करता येणार आहे. यामुळे येथील रोजची होणारी वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सी लिंकपर्यंत सिग्नलमुक्त वेगवान प्रवास करता येणार आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
मरीन ते वांद्रे 15 मिनिटांत, प्रवास होणार सुस्साट, सरकारकडून खास भेट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement