मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा 3 दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत मोठे बदल, कारण काय?
- Reported by:Sitraj Ramesh Parab
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Pune expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 3 दिवसांसाठी या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई: मुंबई-पुणे प्रवास रस्तेमार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर डोंगरगाव-कुसगावनजीक पुणे वाहिनीवर पूल बांधला जात आहे. त्याचे गर्डर बसवण्यासाठी नुकताच 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आता याच मार्गावर पुन्हा एकदा 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आता 27 जानेवारीपासून पुढे 3 दिवस गर्डर बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना योग्य नियोजन करावे लागणार आहे.
येत्या 27 जानेवारी ते 29 जानेवारी या तीन दिवशी दररोज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत 3 तासांचा ब्लॉक एमएसएरडीसीकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक इतर मार्गाने वळवली जाणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वरसोली टोलनाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोडमार्गे पुण्याकडे वळवण्यात येईल.
advertisement
पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक मुंबई वाहिनीवरून सुरू राहणार आहे. या वाहतूक बदलाची नोंद घेऊन वाहनधारकांना आपल्या प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी एमएसआरडीसीने याबाबत आवाहन केले आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांनी 27 ते 29 जानेवारी दरम्यान दुपारी 12 ते 3 या वेळेतील प्रवासाचे योग्य ते नियोजन करावे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2025 8:38 AM IST










