मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये रविवारी (उद्या) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा- मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11:05 ते दुपारी 3:45 पर्यंत माटुंगा- मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई सीएसएमटी येथून सकाळी 10:36 ते दुपारी 3:10 वाजेपर्यंत जलद मार्गावर सुटणाऱ्या लोकल माटुंगा स्थानकापासून मुलुंड स्थानकापर्यंत डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात माटुंगा ते मुलुंड स्थानकापर्यंत डाऊन फास्ट लोकल डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहे.
advertisement
दरम्यान, मेगाब्लॉकच्या काळातील सर्व लोकल 15 मिनिटांनी उशिरा धावणार आहेत. तर ठाण्यानंतर या लोकल पुन्हा जलद मार्गावर धावतील. तसेच ठाण्याहून सुटणाऱ्या अप फास्ट गाड्याही मुलुंडपासून माटुंगापर्यंत स्लो लाईनवर धावतील आणि त्या देखील 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत. मध्य रेल्वेप्रमाणे, पश्चिम रेल्वेवरही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. पण हा मेगाब्लॉक शनिवारी मध्यरात्री घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. वसई रोड- भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक शनिवारी मध्यरात्री 1:15 ते पहाटे 4:45 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
दरम्यान, ब्लॉक कालावधीत विरार- भाईंदर आणि बोरिवली दरम्यान धावणाऱ्या जलद लोकलना धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. काही लोकल गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात येतील. मात्र, पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही मेगाब्लॉक नसेल. ट्रान्स हार्बर रेल्वेवरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे- वाशी/ नेरुळ मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा पूर्णपणे बंद राहील. ठाण्याहून सुटणाऱ्या वाशी/ नेरुळ/ पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या आणि पनवेलकडून ठाण्याकडे येणार्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना प्रवाशांनी रेल्वेच्या या बदलांचा विचार करून बाहेर पडण्याचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
