वन विभागामध्ये नोकरीच्या संधी, शेवटची तारीख आली जवळ; असा करा अर्ज
या काळामध्ये तब्बल साडे चौदा तासांचा (14 तास 30 मिनिटे) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवारी रात्री 11:05 ते रविवारी दुपारी 01:05 मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. साडे चौदा तासांच्या मेगाब्लॉकच्या काळामध्ये, वडाळा रोड- मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहील. या काळामध्ये हार्बर रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेगाब्लॉकच्या काळामध्ये, हार्बर रेल्वेवरील कुर्ला स्थानक आणि टिळक नगर स्थानकादरम्यान प्रस्तावित रेल्वे डायव्हर्जनसाठी हार्बर लाईनचे ट्रॅक पुन्हा समरेखित (Will Align) केले जाणार आहे.
advertisement
मुंबईकरांनो! ॲाफिसला जाण्याआधी ही बातमी वाचा! कारण इथं मार्ग आहे बंद
दरम्यान, शनिवारी रात्री 10: 20 ते रविवारी दुपारी 02:19 पर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील. तर, शनिवारी रात्री 10:07 वाजेपासून रविवारी दुपारी 12:56 वाजेपर्यंत पनवेलहून सीएसएमटीला जाणारी सेवा रद्द असेल.डाऊन हार्बर मार्गावरून सीएमटीवरून वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल शनिवारी रात्री 10:14 वाजता सुटेल. डाऊन हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतरची पहिली लोकल सीएसएमटीवरून रविवारी दुपारी 01:30 वाजता सुटेल. ब्लॉकदरम्यान पनवेल- मानखुर्द- पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.
पाली भाषेला स्वतंत्र विभाग द्यावा ; मुंबई विद्यापीठात पाली भाषेसाठी 23 दिवसांपासून सुरू आंदोलन
दरम्यान, मध्य रेल्वेवरही मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 09:00 ते दुपारी 01:00 या कालावधीत घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) या स्थानकावर जाणाऱ्या आणि येथून सुटणाऱ्या सुमारे 18 एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील. तर, पश्चिम रेल्वेवरील मेमू ट्रेन 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावतील. तसेच सकाळी 09:50 ची वसई रोड- दिवा मेमू गाडी कोपर स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे.