पश्चिम रेल्वेच्या बहुतेक डब्यांमध्ये सध्या सीसीटीव्ही नाहीत. रेल्वेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण 1,415 डब्यांपैकी केवळ 226 डब्यांमध्ये कॅमेरे बसवले आहेत. यामध्ये 147 महिला डबे आणि 79 सामान्य डब्यांचा समावेश आहे. म्हणजेच फक्त 33 टक्के महिला डबे आणि अवघे 8 टक्के डबेच सीसीटीव्हीच्या कक्षेत आले आहेत. आता नव्या योजनेनुसार सर्व महिला डब्यांना प्राधान्याने सीसीटीव्ही आणि टॉक-बॅक सिस्टम बसवली जाणार आहे. विशेष म्हणजे हे काम वर्षअखेरीस पूर्ण करण्याचे लक्ष्य असून त्यानंतर सामान्य डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवली जाईल.
advertisement
Mumbai Local: मुंबईकरांचा खोळंबा! कर्जतला 3 दिवस पॉवर ब्लॉक; नेरळ, खोपोली लोकल रद्द, पाहा वेळापत्रक
सीसीटीव्हीमुळे असा होणार फायदा
पश्चिम रेल्वेने सुरक्षित प्रवासासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे रेल्वे बोर्डाने अगदी लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये देखील सीव्हीव्हीआरएस (कॅमेरा सिस्टम) बसवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या 231 मोटरमन केबिनपैकी केवळ 51 केबिनमध्येच ही प्रणाली बसवण्यात आली आहे. पुढील टप्प्यात सर्व मोटरमन केबिनमध्ये कॅमेरे बसवले जातील. या एका सीव्हीव्हीआरएसची किंमत 1 लाख 25 हजार रुपये असेल. या प्रणालीमुळे मोटरमनकडून होणाऱ्या चुका कमी होण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.