आलोक सिंह यांच्यावर जेव्हा हल्ला झाला, त्यानंतर ते 45 मिनिटं रेल्वे स्टेशनवरच पडून होतं. त्यानंतर त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आलोक सिंह यांचे काका सुनील सिंह यांनी खळबळजनक आरोप केला आहे. आलोकला तातडीने रुग्णालयात का घेऊन गेले नाही? त्याला वेळेवर उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता, असं आलोकच्या काकांनी म्हटलं आहे. रेल्वे पोलिसांनी आलोकला उपचार मिळाल्याचे सीसीटीव्ही दाखवले पण ते पुरेशे नव्हते, असं त्याच्या काकाने म्हटलं आहे.
advertisement
आलोक सिंग यांना मालाड येथील जवळच्या रुग्णालयात न नेता, गर्दीच्या वेळी सुमारे 4.5 किलोमीटर दूर असलेल्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात का हलवण्यात आलं? या प्रश्नावर उत्तर देताना एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं की, कार्यपद्धतीनुसार ते रुग्णांना फक्त सरकारी रुग्णालयात दाखल करतात आणि खाजगी रुग्णालये टाळतात, कारण वैद्यकीय बिलाचा खर्च कोण उचलणार याबाबत स्पष्टता नसते. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या गैरजबाबदारपणामुळे आलोकचा जीव गेला का? असा सवाल विचारला जात आहे.
दरम्यान, आलोकला जीवे ठार मारण्याचा आपला हेतू नव्हता, असा दावा ओंकारने पोलिसांसमोर केला आहे. ट्रेनचा वेग कमी झाल्यावर ओमकारने आलोकला एकदा चिमट्याने टोचले आणि तो पळून गेला. आलोक आपला पाठलाग करेल या भीतीने तो वेगाने पळून गेला, असंही त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे. आलोकच्या मृत्यूची कल्पना नव्हती आणि म्हणूनच तो दुसऱ्या दिवशी रेल्वे स्टेशनवर आला, असंही त्याने सांगितलं.
