मुंबईकरांना दक्षिण मुंबईतून अवघ्या 10 ते 60 रुपयांत आरामदायी प्रवास करता येणार आहे. त्यामुळे लेडी जमशेदजी मार्ग आणि डॉ. ॲनी बेझंट मार्ग येथील वाहतूक कोंडीतून सुटकाही होणार आहे. तसेच धारावी, दादर, सिद्धिविनायक आणि वरळीसारख्या वर्दळीच्या मार्गावरून जाण्याची गरज भासणार नाही.
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खूशखबर! मिठी नदीखालून धावली मेट्रो, कधी सुरू होणार प्रवास?
advertisement
दरम्यान, मेट्रो 3 चा पहिला टप्पा आरे ते बीकेसी हा 12.4 किलोमीटरचा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यात सुरू झाला. या मार्गावर दररोज 4 लाख प्रवाशी प्रवास करतील असा अंदाज होता. परंतु, याला कमी प्रतिसाद मिळाला. तरीही सततच्या वाहतूक कोंडीपेक्षा अनेक प्रवासी मेट्रो प्रवासाला पसंती देताना दिसत आहेत.
मेट्रो 3 चे काम 3 टप्प्यांत
‘ॲक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो 3 चे काम सध्या प्रगतीपथावर आहे. 33.5 किलोमीटर लांबीच्या या मेट्रोचे काम 3 टप्प्यात होत आहे. आरे ते बीकेसी हा 12.4 किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून ऑक्टोरबर 2024 पासून या मार्गावर वाहतूक सुरू आहे. तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा 9.8 किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याठिकाणी चाचणी सुरू असून या महिन्यात या मार्गावरून देखील वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात आरे ते वरळीपर्यंत प्रवास मेट्रोतून करता येणार आहे. तर शेवटचा टप्पा वरळी ते कफ परेड हा 11.3 किलोमीटर अंतराचा असून याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. जुलै 2025 मध्ये याचे काम पूर्ण होऊन संपूर्ण आरे ते कफ परेड अशी 33.5 किलोमीटर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन आहे.
तिकीट दर काय?
मार्चमध्ये मेट्रो 3 ही आरे ते वरळी अशी 22.5 किलोमीटर धावणार आहे. यासाठी 10 रुपये ते 60 रुपयांपर्यंत तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. आरे ते सिप्झ दरम्यान 10 रुपये, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका 20 रुपये, टी-2, सहार रोड, टी-2 30 रुपये, सांताक्रुझ, बांद्रा कॉलनी 40 रुपये, बीकेसी, धारावी, शितला देवी मंदिर, दादर 50 रुपये आणि सिद्धिविनायक, वरळी, आचार्य अत्रे चौक 60 रुपये मोजावे लागणार आहेत.