advertisement

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खूशखबर! मिठी नदीखालून धावली मेट्रो, कधी सुरू होणार प्रवास?

Last Updated:

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खूशखबर असून लवकरच धारावी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो सुरू होणार आहे. मिठी नदीच्या खालून जाणाऱ्या या मार्गावर चाचणी सुरू झाली आहे.

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खूशखबर! मिठी नदीखालून धावली मेट्रो, कधी सुरू होणार प्रवास?
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खूशखबर! मिठी नदीखालून धावली मेट्रो, कधी सुरू होणार प्रवास?
मुंबई: मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो 3 मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गिकेतील धारावी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या 9.77 किमी लांबीच्या टप्प्यावर मेट्रोची पहिली चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. विशेष म्हणजे, या चाचणी दरम्यान मेट्रो गाडी पहिल्यांदाच मिठी नदीखालून धावली. हा एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. आता पुढील काही महिन्यांत यंत्रणा, सिग्नल आणि सुरक्षेच्या चाचण्या घेतल्या जाणार असून त्यानंतर मेट्रोचा प्रवास सुरू होणार आहे.
मेट्रो प्रवाशांसाठी कधी सुरू होणार?
धारावी ते आचार्य अत्रे चौक हा मेट्रो मार्ग वित्तीय वर्ष 2024-25 च्या अखेरपर्यंत (मार्च 2025 पर्यंत) प्रवाशांसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे. हा टप्पा सुरू झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचे उद्घाटन होऊ शकते.
advertisement
6 प्रमुख स्थानके
या मेट्रो मार्गावर 6 प्रमुख स्थानके असणार आहेत. यामध्ये धारावी, शितला देवी मंदिर, दादर मेट्रो, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक स्थानकांचा समावेश असणार आहे.
मेट्रो तिकिटाचे दर  
मुंबई मेट्रो लाइन 3 साठी तिकिट दर किमान 10 रुपये आणि कमाल 50 रुपये असा असेल.
आरे – बीकेसी मेट्रो मार्गाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) 32.5 किमी लांबीच्या ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो 3 चे बांधकाम करत आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानचा 12.69 किमी लांबीचा टप्पा ऑक्टोबर 2024 मध्ये सेवेत दाखल झाला. मात्र, या मेट्रोला अपेक्षेप्रमाणे प्रवासी मिळत नाहीत. सुरुवातीला रोज 4 लाख प्रवासी या मेट्रो मार्गावर प्रवास करतील असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात फक्त 20 हजार प्रवासीच या मेट्रोचा वापर करत आहेत. त्यामुळे मेट्रो 3 मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढवणे हे MMRC साठी मोठे आव्हान ठरत आहे.
advertisement
दरम्यान, मुंबई मेट्रो 3 मार्गिका पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांसाठी जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खूशखबर! मिठी नदीखालून धावली मेट्रो, कधी सुरू होणार प्रवास?
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement