TRENDING:

Monsoon ची बदलली दिशा? कुठे राहिली पाऊस, पुढचे 10 दिवस हवामानात मोठे बदल, IMD चा अंदाज पुन्हा चुकला का?

Last Updated:

मुंबईत ऊन पावसाचा खेळ सुरू असून, मान्सूनची दिशा बदलल्याचा संशय आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने ईशान्य व दक्षिण भारतात मुसळधार पाऊस आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: ऊन पावसाचा खेळ सलग दोन ते तीन दिवस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाज चुकतोय का असा प्रश्न पडला आहे. मागच्या दोन तीन दिवसांपासून घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईत 26 मे रोजी मान्सूनची दिमाखदार एंट्री झाली खरी, पण त्यानंतर त्याचा वेगच थांबला आहे. पालघरसुद्धा गाठू न शकलेल्या मान्सूनची दिशा आता बदलली की काय असा संशय व्यक्त केला जात आहे.
News18
News18
advertisement

अरबी समुद्रातील मान्सूनची रेषा पुढे सरकण्याऐवजी स्थिर आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर मान्सून उशिरा दाखल होणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे. मुंबईसह ज्या ज्या भागात मान्सून दाखल झाला तिथे पुन्हा 10 ते 12 जूनदरम्यान धो धो पावसाला सुरुवात होईल असा प्राथमिक अंदाज आहे. सध्या विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आहे. पाऊसही हवामान विभागाला हुल देत आहे.

advertisement

बंगालच्या उपसागरात जोरदार वारे

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे ईशान्य भारतात आणि दक्षिण भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात मात्र पावसाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे अनेकांचं लक्ष हवामान खात्याच्या पुढच्या भाकितांकडे लागलं आहे.

advertisement

IMD चा अंदाज पुन्हा चुकला?

हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेपेक्षा लवकर येईल आणि झपाट्याने पुढे सरकेल, असा अंदाज वर्तवला होता. पण सध्या तसं काही घडताना दिसत नाही. हवामान विभागाचे माजी अधिकारी कृष्णानंद होसाळीकर सांगतात की, समुद्रसपाटीपासून सुमारे 3 किमी उंचीवर ढगांची एक मजबूत रेषा तयार झाली आहे. ही रेषा मान्सूनला पुढे जाण्यापासून थांबवत आहे. याचबरोबर, खालच्या थरातील वारे दक्षिणेकडे वाहत आहेत, त्यामुळे पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.

advertisement

मुंबईकर पाणी जपून वापरा, धरणांत फक्त 12 टक्के पाणीसाठा, जूनमध्येच पाणीकपातीचं संकट?

मुंबईकरांना घामाच्या धारा

मुंबईत सध्या 32–33°C इतकं तापमान आहे. आर्द्रता सकाळी 90% च्या वर, तर दिवसभरात 70–75% दरम्यान राहत आहे. त्यामुळे उष्णतेचा त्रास होत असून उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढचे किमान 10 दिवस राज्यभर फारसा पाऊस होण्याची शक्यता नाही. यामुळे उकाडा आणखी वाढू शकतो, साधारण दीड आठवडा हा उकाडा सहन करावा लागू शकतो.

advertisement

Pune Rain: पुणे ते कोल्हापूर आज कसं असेल हवामान? IMD कडून आलं 24 तासांचं अपडेट

महाराष्ट्रात पाऊस 12–14 जूनदरम्यान?

सध्याच्या हवामान मॉडेल्सनुसार, राज्यात मान्सून 12 ते 14 जूनच्या दरम्यानच सक्रीय होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत शेतीची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Monsoon ची बदलली दिशा? कुठे राहिली पाऊस, पुढचे 10 दिवस हवामानात मोठे बदल, IMD चा अंदाज पुन्हा चुकला का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल