जेन झी अर्थात जनरेशन झेड ही तरुण पिढी सध्या जगातल्या अनेक देशांमध्ये क्रांती घडवते जैन झी ची लोकप्रियता लक्षात मुंबई महानगरपालिकेत सर्वच पक्षांनी ज्यांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा तरुणांना निवडणूक लढवण्याची संधी दिली. त्यातील 12 जणांना निवडून आले आहेत. सभागृहात ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवक असले तरी सर्वात मोठा गट मध्यमवयीनांचा आहे. मात्र, नव्या पिढीच्या या प्रतिनिधींमुळे पालिकेच्या कामकाजात नवा उत्साह आणि दृष्टिकोन येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
अवघ्या 22 वर्षी गळ्यात नगरसेवकपदाची माळ (Youngest corporator in BMC)
वॉर्ड 151 च्या नगरसेविका 22 वर्षीय कशिश फुलवारिया भाजपच्या तिकीटावर विजयी झाल्या आहेत.
या तरुण नगरसेवकांमध्ये सर्वात कमी वयाची नगरसेविका म्हणजे वॉर्ड 151 मधून निवडून आलेली कशिश फुलवारिया आहेत. त्या माजी नगरसेवक राजेश फुलवारिया यांच्या कन्या आहेत. 2017 ते 2022 या कालावधीत त्यांनी या वॉर्डचे प्रतिनिधित्व केले होते. बीएमएस पदवी घेतलेल्या काशिश सध्या एमबीएचे शिक्षण घेत आहेत.
वॉर्ड 80 मधून निवडून आलेल्या दिशा यादव या दोन माजी नगरसेवकांची मुलगी आहेत. व्यवसायाने दागिन्यांची डिझायनर असलेल्या दिशा स्वतःचा स्टार्टअप चालवतात. दुसरीकडे वॉर्ड 167 मधून निवडून आलेल्या डॉ. समन आझमी या होमिओपॅथिक डॉक्टर असून त्या अनुभवी नगरसेवक अश्रफ आझमी यांच्या पुतणी आणि काँग्रेस पदाधिकारी अश्रद आझमी यांच्या कन्या आहेत.
कोण आहेत ते 12 नगरसेवक? (BMC Gen Z Corporator)
| नाव | पक्ष | वय | वॉर्ड |
| डॉ. अदिती खुरसंगे | शिवसेना | 29 | बोरिवली ईस्ट |
| दक्षता कवठणकर | भाजप | 28 | कांदिवली वेस्ट |
| हैदर अली शेख | काँग्रेस | 28 | मलाड वेस्ट |
| अंकित प्रभू | शिवसेना उबाठा | 29 | गोरेगाव ईस्ट |
| दिशा यादव | भाजप | 29 | अंधेरी ईस्ट |
| रितेश राय | शिवसेना | 29 | अंधेरी ईस्ट |
| आयेशा खान | राष्ट्रवादी काँग्रस | 28 | वांद्रे ईस्ट |
| राजूल पाटील | शिवसेना उबाठा | 29 | भांडूप वेस्ट |
| निर्मिती कानडे | शिवसेना | 25 | घाटकोपर ईस्ट |
| समन आझमी | काँग्रेस | 29 | कुर्ला वेस्ट |
| अपेक्षा खांडेकर | शिवसेना | 29 | मानखुर्द |
| कशिश फुलवारिया | भाजप | 22 | चेंबुर/ कुर्ला |
तरुण नगरसेवकांचा हा नवा गट फक्त नावापुरते प्रतिनिध न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या कारभारात नव्या पिढीचा आवाज अधिक ठळक होण्याची शक्यता आहे.
