TRENDING:

ज्वारी पिकावर कीटकांचा वाढता प्रादुर्भाव? असं करा रोग व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

ज्वारी हे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये लागवड होणारे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. कमी पाण्यात येणारे आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असल्यामुळे ज्वारीला विशेष महत्त्व आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : ज्वारी हे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये लागवड होणारे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. कमी पाण्यात येणारे आणि  पोषणमूल्यांनी समृद्ध असल्यामुळे ज्वारीला विशेष महत्त्व आहे. मात्र, या पिकावर विविध प्रकारच्या कीटकांचा प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते. योग्य वेळी उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली आहे
advertisement

ज्वारी पिकावर आढळणाऱ्या प्रमुख कीटकांमध्ये कणखजूर किड (Shoot Fly), खोडमाशी (Stem Borer), मावा (Aphids) आणि लष्करी अळी (Armyworm) यांचा समावेश होतो. कणखजूर किड प्रामुख्याने पेरणीनंतर सुरुवातीच्या अवस्थेत पिकावर हल्ला करते. या किडीमुळे रोपाचा मध्यभाग सुकून जातो आणि डेड हार्ट लक्षण दिसून येते. त्यामुळे रोपाची वाढ थांबते आणि उत्पादनावर थेट परिणाम होतो.

advertisement

Agriculture News : कांद्याने केले हाल, विक्रीतून लागवडी खर्चही नाही निघाला, शेतकरी हवालदिल

खोडमाशी ही ज्वारीवरील अत्यंत हानिकारक कीड असून ती खोडात शिरून आतून खोड पोखरते. यामुळे झाडातील अन्नद्रव्यांचा पुरवठा बंद होतो आणि झाड कमजोर बनते. मावा हा कीटक पानांवर समूहाने चिकटून रस शोषतो. त्यामुळे पाने पिवळी पडतात, झाडाची वाढ खुंटते आणि कधी कधी संपूर्ण पीक वाळण्याची परिस्थिती निर्माण होते. लष्करी अळी पाने कुरतडून मोठ्या प्रमाणावर नुकसान करते.

advertisement

या सर्व कीटकांच्या प्रादुर्भावामुळे ज्वारीचे दाणे पूर्ण भरत नाहीत, कणसाची गुणवत्ता घटते आणि एकूण उत्पादनात लक्षणीय घट होते. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कीड व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष न करता वेळेवर प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक ठरते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ज्वारी पिकावर कीटकांचा वाढता प्रादुर्भाव? असं करा रोग व्यवस्थापन, Video
सर्व पहा

ज्वारीवरील कीड आणि रोग नियंत्रणासाठी फॉल आर्मीवर्म/खोडकीड यासाठी क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5% SC @ 0.4 मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर करपा आणि पानावरील डाग यांसारख्या बुरशीजन्य रोगांसाठी मॅन्कोझेब 75% WP @ 2 ग्रॅम/लिटर किंवा प्रोपिकोनाझोल @ 1 मिली/लिटर फवारणी उपयुक्त ठरते. अशा शास्त्रीय उपाययोजनांमुळे ज्वारी पीक निरोगी राहून उत्पादनात वाढ होण्यास निश्चितच मदत होते.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
ज्वारी पिकावर कीटकांचा वाढता प्रादुर्भाव? असं करा रोग व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल