TRENDING:

Job Recruitment : 8 वी- 10 वी पासला डॉकयार्डमध्ये जॉबची मोठी संधी, काय आहे पात्रता ? असा करा अर्ज

Last Updated:

Job Recruitment : मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड कंपनीमध्ये नोकरभरती निघाली आहे. अलीकडेच नोकरीची जाहिरात निघाली असून इच्छुक उमेदवारांनी तात्काळ नोकरीसाठी अर्ज करावा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डॉकयार्ड कंपनीमध्ये नोकरी करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आता मोठी संधी आली आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड कंपनीमध्ये नोकरभरती निघाली आहे. अलीकडेच नोकरीची जाहिरात निघाली असून इच्छुक उमेदवारांनी तात्काळ नोकरीसाठी अर्ज करावा. मुंबईच्या नेव्ही डॉकयार्ड कंपनीमध्ये कोणकोणत्या पदांसाठी किती जागांची अर्ज आहे? शैक्षणिक पात्रता किती? आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख किती? अशा अनेक प्रश्नांची माहिती जाणून घेऊया...
Job Recruitment : 8 वी- 10 वी पासला डॉकयार्डमध्ये जॉबची मोठी संधी, काय आहे पात्रता ? असा करा अर्ज
Job Recruitment : 8 वी- 10 वी पासला डॉकयार्डमध्ये जॉबची मोठी संधी, काय आहे पात्रता ? असा करा अर्ज
advertisement

खुशखबर! सरकारी कंपनीत अप्रेंटिसशिपची संधी, 12वी उत्तीर्ण उमेदवार त्वरित करू शकतात अर्ज

मुंबईमध्ये नेव्ही डॉकयार्ड कंपनीमध्ये 286 पदांसाठी अप्रेंटीसशिपची भरती केली जात आहे. नवख्या तरुणांना आणि नुकतेच शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांना सरकारी नोकरीची फार मोठी संधी आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून परीक्षा सुद्धा ऑनलाईनच असणार आहे. 8वी, 10वी आणि ITI उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळण्याची खूप मोठी संधी आहे. 1 सप्टेंबर पासून सुरू झालेली ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. नेव्ही डॉकयार्ड कंपनीमध्ये नोकर भरतीसाठीची परीक्षा ऑक्टोबर 2025 मध्ये होणार आहे. तर, नोकरीचं ठिकाण मुंबई असणार आहे.

advertisement

पुण्यात मंडळाचा अनोखा देखावा, 10 हजार पार्ले-जी बिस्किटातून उभारला शनिवार वाडा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

मॅकेनिक, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर, कम्प्युटर ओप्रेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, डिझेल मॅकेनिक सह अशा अनेक वेगवेगळ्या पोस्टसाठी नोकरीच्या संधी आहेत. या नोकरीसाठी उमेदवाराचं वय किमान 14 वर्षे सांगितले आहे. परंतु जास्तीत वयाची मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया भरल्या जाणाऱ्या या भरतीमध्ये अर्जदारांकडून फी घेतली जाणार नाही. सर्वांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आला आहे. नोकरीबद्दलच्या माहितीमध्ये पगाराबद्दल माहिती दिलेली नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबरपर्यंत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे, ज्यात पात्रता निकष, निवड प्रक्रिया आणि इतर महत्वाच्या सूचनांचा तपशीलवार उल्लेख असेल.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Job Recruitment : 8 वी- 10 वी पासला डॉकयार्डमध्ये जॉबची मोठी संधी, काय आहे पात्रता ? असा करा अर्ज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल