RCFL Apprentice Bharti 2025 : खुशखबर! सरकारी कंपनीत अप्रेंटिसशिपची संधी, 12वी उत्तीर्ण उमेदवार त्वरित करू शकतात अर्ज
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
RCFL Apprentice Bharti 2025 : आरसीएफएल म्हणजेच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. आरसीएफएलमध्ये पदवीधर, टेक्निशियन आणि ट्रेडसाठी अप्रेंटिसशिपची घोषणा करण्यात आली आहे.
सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आरसीएफएल म्हणजेच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. आरसीएफएलमध्ये पदवीधर, टेक्निशियन आणि ट्रेडसाठी अप्रेंटिसशिपची घोषणा करण्यात आली आहे. आरसीएफएल कंपनीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी लवकरच भरती केली जाणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अनेक तरूणांसाठी ही करियरच्या दृष्टीने महत्वाची बातमी आहे. कोणकोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, एकूण किती पदे आहेत ? जाणून घेऊया...
राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीमध्ये 325 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये, पदवीधर, टेक्निशियन आणि ट्रेड या पदांसाठी अप्रेंटिसशिपसाठी भरती सुरू आहे. या पदांसाठी वयोमर्यादा जास्तीत जास्त २५ असून कमीत कमी १८ आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी वयाच्या 5 वर्षांची सूट दिली जाणार आहे. तर, इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. ट्रॉम्बे, मुंबई आणि थळ, रायगड जिल्हा हे नोकरीचं ठिकाण असणार आहे. आरसीएफएल कंपनीमध्ये अप्रेंटिसशिपची असलेली अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे.
advertisement
29 ऑगस्टपासून सुरू झालेली ऑनलाईन भरती प्रक्रियेची शेवटची तारीख 12 सप्टेंबर आहे. 12 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात. महत्वाची बाब म्हणजे, अर्ज भरताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज भरावे लागणार नाही. अर्ज फी नाहीये. पदवीधर अप्रेंटिसशिपसाठी 50% गुणांसह B.Com/ BBA/ अर्थशास्त्रात पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी अशी शैक्षणिक पात्रता हवी आहे. तर टेक्निशियन अप्रेंटिससाठी 50% गुणांसह (Chemical/ Civil/ Computer/ Electrical/ Instrumentation/ Mechanical) या विभागागातील इंजिनिअरिंग डिप्लोमा व्हायला हवा.
advertisement
तर, ट्रेड अप्रेंटिससाठी 50% गुणांसह (Physics, Chemistry, Mathematic) या विषयात B.Scची पदवी किंवा 12वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता हवी आहे. पदवीधर अप्रेंटिस साठी 115, टेक्निशियन अप्रेंटिस साठी 114 आणि ट्रेड अप्रेंटिस साठी 96 पदांची संख्या आहे. नोकरीबद्दलच्या माहितीमध्ये पगाराबद्दल माहिती दिलेली नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीखसाठी अद्याप बराच उशीर असला तरीही पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे, ज्यात पात्रता निकष, निवड प्रक्रिया आणि इतर महत्वाच्या सूचनांचा तपशीलवार उल्लेख असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 31, 2025 7:12 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
RCFL Apprentice Bharti 2025 : खुशखबर! सरकारी कंपनीत अप्रेंटिसशिपची संधी, 12वी उत्तीर्ण उमेदवार त्वरित करू शकतात अर्ज