Ganeshotsav 2025: पुण्यात मंडळाचा अनोखा देखावा, 10 हजार पार्ले-जी बिस्किटातून उभारला शनिवार वाडा, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
गणेशोत्सवात प्रत्येक मंडळ स्वतःची सजावट, देखावे आणि सामाजिक संदेश यामुळे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करत असते. यंदा पुण्यातील ग्राहक पेठ सेवक गणेशोत्सव मंडळाने अशीच एक आगळीवेगळी कल्पना साकारली आहे.
पुणे: गणेशोत्सवात प्रत्येक मंडळ स्वतःची सजावट, देखावे आणि सामाजिक संदेश यामुळे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करत असते. यंदा पुण्यातील ग्राहक पेठ सेवक गणेशोत्सव मंडळाने अशीच एक आगळीवेगळी कल्पना साकारली आहे. मंडळाकडून तब्बल 10 हजार पार्ले-जी बिस्किटांचा वापर करून ऐतिहासिक शनिवार वाड्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना ग्राहक पेठ सेवक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी दिली.
गणेशोत्सवात ऐतिहासिक वारसा जिवंत ठेवत समाजाला आकर्षित करण्याचा हा प्रयत्न नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. पार्ले-जी बिस्किटांचा एकसंध वापर करून तयार केलेली ही प्रतिकृती पाहताना खऱ्या शनिवार वाड्याचा भास निर्माण होतो. सूक्ष्म नक्षीकाम, दरवाजे, खिडक्या, तसेच किल्ल्याच्या भिंतींची अचूक मांडणी हे विशेष वैशिष्ट्य आहे.
advertisement
सूर्यकांत पाठक यांनी सांगितले की, पुणे शहरात मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संदेश देणाऱ्या देखाव्यांचे आयोजन केले जाते. मात्र कमी वयोगटातील लहान मुलांना पौराणिक आणि धार्मिक देखाव्यांचा आनंद घेता येत नव्हता. हीच गोष्ट लक्षात घेऊन मागील 29 वर्षांपासून ग्राहक पेठ सेवक मंडळाकडून चॉकलेट आणि बिस्कीट संबंधित देखाव्याचे आयोजन केले जाते.
advertisement
बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार वाड्याची प्रतिकृती
view commentsकाही दिवसांपूर्वी श्रीमंत बाजीराव पेशवे यांची 325 वी जयंती साजरी करण्यात आली. याचेच औचित्य साधून बाजीराव पेशवे यांची शौर्यगाथा तळागाळात पोहोचवण्यासाठी यंदा शनिवार वाड्याची प्रतिकृती उभारण्यात आल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 02, 2025 5:42 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ganeshotsav 2025: पुण्यात मंडळाचा अनोखा देखावा, 10 हजार पार्ले-जी बिस्किटातून उभारला शनिवार वाडा, Video

