Ganesh Visarjan 2025 : गौरी- गणपतीच्या विसर्जनासाठी चौपाट्या सज्ज, महापालिका भक्तांसाठी पुरवणार महत्वाच्या सेवा- सुविधा

Last Updated:

Ganesh Visarjan 2025 : आज संपूर्ण राज्यात 7 दिवसांच्या गौराई आणि गणरायाचे विसर्जन होणार आहे. विसर्जनानिमित्त मुंबई महानगर पालिकेने अनेक सेवा- सुविधा पुरवल्या आहेत. गौराई आणि गणपती बाप्पााच्या निरोपासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Thane Ganesh Visarjan: दीड दिवसांच्या बाप्पाचं होणार विसर्जन, ठाणेकरांसाठी महापालिकेची विशेष सोय
Thane Ganesh Visarjan: दीड दिवसांच्या बाप्पाचं होणार विसर्जन, ठाणेकरांसाठी महापालिकेची विशेष सोय
27 ऑगस्टला लाडक्या गणरायाचे मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये दणक्यात आगमन झाले. सोबतच आता गौराईचेही आगमन झाले आहे. गणरायाची आणि गौराई पुजा आणि आराधना झाल्यानंतर आज विसर्जन केले जाणार आहे. गौराई आणि गणेशमुर्तींचे मंगळवारी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी विसर्जन केले जाणार आहे. गौराई आणि गणेशमुर्तींच्या विसर्जनासाठी मुंबई महानगर पालिकेने आणि राज्य सरकारने जय्यत तयारी केली आहे. चौपाट्या, नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मुंबई महानगर पालिकेतर्फे विविध सेवा- सुविधा पुरवल्या जात असून विसर्जनाची जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे.
मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये, विसर्जनासाठी चौपाट्या, नैसर्गिक तलाव आणि 288 कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेने अनेक सेवा सुविधाही पुरवल्या आहेत. चौपाट्यांवर समुद्रकिनारी ‘ब्लू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर लक्षात घेऊन मत्स्यदंश होणार नाही, याची काळजी विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांनी घ्यावी, असे आवाहन सुद्धा पालिकेने नागरिकांना केले आहे. कृत्रिम तलावांची माहिती मिळवण्यासाठी महानगर पालिकेने क्यू आर कोडचीही सोय केली आहे. त्या कोडवर भाविकांना आपल्या घराजवळ कृत्रिम तलाव कुठे आहे? किती दूर आहे? अशी सर्व माहिती मिळेल.
advertisement
संपूर्ण महानगर पालिका क्षेत्रामध्ये, एकूण 288 कृत्रिम तलावांची आणि नैसर्गिक तलावांची सोय करण्यात आलेली आहे. कृत्रिम तलावांवर 6 फूट उंचीच्या मुर्तींना विसर्जनाची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, तलावातील पाण्याची पातळी मुर्तींच्या उंचीप्रमाणेच ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुंबईत रविवारी पाच दिवसांच्या एकूण 36 हजार 672 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या 36 हजार 672 मूर्तींमध्ये पीओपीच्या 23 हजार 204, तर शाडूच्या 13 हजार 468 मुर्तींचा समावेश आहे. तसेच समुद्र आणि नैसर्गिक तलावांत सहा फुटांवरील पीओपीच्या 13 आणि शाडूच्या 22, अशा एकूण 135 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
advertisement
गिरगाव, दादर आणि माहीमसह आदी चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जीवरक्षकांसह मोटारबोटी तैनात केल्या आहेत. मूर्ती विसर्जनासोबत भाविकांनी आणलेले आणि अर्पण केलेले हार, फुले आदी निर्माल्य जमा करण्यासाठी 163 निर्माल्य कलशांसह 274 निर्माल्य वाहनांचीही व्यवस्था केली आहे. प्रथमोपचार केंद्रांसह रुग्णवाहिका सज्ज झाल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनांसह प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Ganesh Visarjan 2025 : गौरी- गणपतीच्या विसर्जनासाठी चौपाट्या सज्ज, महापालिका भक्तांसाठी पुरवणार महत्वाच्या सेवा- सुविधा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement