वाढदिवसाच्या पार्टीत संतापजनक कृत्य: तक्रारदार मुलगी ही मुलुंड परिसरात आपल्या पालकांसोबत राहते. सोमवारी (१२ जानेवारी) तिच्या एका मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने ती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. रात्री उशिरा हे सर्वजण नाहूर येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी जमले होते. याच ठिकाणी मैत्रिणीच्या ४६ वर्षीय वडिलांनी संधी साधून पीडित मुलीशी अश्लील चाळे केले. त्याने पीडितेच्या छातीला स्पर्श करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
Pune Crime: पुणेकरांनो लॉक लावून घराबाहेर जाणार असाल तर 'ही' एक चूक करू नका, 2 धक्कादायक घटना समोर
या धक्कादायक प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी गेल्यावर सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. पीडितेच्या आईने आरोपीला या कृत्याबद्दल जाब विचारला असता, त्याने आपली चूक मान्य करण्याऐवजी उलट त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. अखेर या कुटुंबाने भांडुप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. भांडुप पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास चक्र फिरवली आणि आरोपीला अटक केली. मात्र, मैत्रिणीच्याच वडिलांनी अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
