पोलीस कुटुंबांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर
या टाऊनशिपमध्ये सुमारे पाच कोटी चौरस फूट क्षेत्र विकसित केले जाणार असून त्यासाठी अंदाजे 20 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी 30 टक्के निधी शासन पुरवेल आणि उर्वरित 70 टक्के निधी विविध बँक आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होईल.
मुंबईत वाढती लोकसंख्या लक्षात घेता सुरक्षा यंत्रणेची गरज आहे. पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी जवळच निवास करत असल्यास ते अधिक तत्परतेने आणि कार्यक्षमतेने आपले काम करू शकतील. मुंबई पोलीस दलात सध्या 51 हजार 308 कर्मचारी काम करतात, परंतु फक्त 22 हजार 904 निवासस्थान उपलब्ध आहेत. त्यापैकी 3 हजार 777 निवासस्थाने जीर्ण किंवा वापरण्यास अयोग्य आहेत.
advertisement
सध्या दर महिन्याला चारशे ते पाचशेहून अधिक अधिकारी-कर्मचारी निवासस्थानांसाठी अर्ज करतात, पण जागा नाहीत. त्यामुळे पोलीसांना रोजच प्रवास करून कामावर यावे लागते. पोलीसांच्या कामाच्या स्वरूपानुसार कार्यालयाजवळ निवासस्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतंत्र टाऊनशिप उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
