TRENDING:

Mumbai Goa Railway: गोव्याला जायचा प्लॅन बदला, मुंबईतून जाणाऱ्या 8 एक्स्प्रेस रद्द, ट्रेनचे मार्ग बदलले, कारण काय?

Last Updated:

Mumbai Goa Railway: मे महिन्याच्या सुट्ट्यांत गोवा ट्रिपचा प्लॅन करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. 8 एक्स्प्रेस ट्रेन रद्द झाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मे महिन्यातील पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या कॅसलरॉक–कुलेम घाट विभागात ट्रॅक नूतनीकरणासाठी 28 एप्रिल ते 7 जून या कालावधीत दररोज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे गोवा मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असून 8 एक्स्प्रेस गाड्या अंशतः रद्द करण्यात येणार आहेत तर 4 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
Mumbai Goa Railway: गोव्याला जायचा प्लॅन बदला, मुंबईतून जाणाऱ्या 8 एक्स्प्रेस रद्द, ट्रेनचे मार्ग बदलले, कारण काय?
Mumbai Goa Railway: गोव्याला जायचा प्लॅन बदला, मुंबईतून जाणाऱ्या 8 एक्स्प्रेस रद्द, ट्रेनचे मार्ग बदलले, कारण काय?
advertisement

ब्लॉक कालावधीत काही महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. शालिमार–वास्को दा गामा (18047/48), तिरुपती/हैदराबाद–वास्को (17419/20, 17021/22), सिकंदराबाद–वास्को (17039/40) तसेच जैसिदीह–वास्को (17321/22) या गाड्या संबंधित तारखांना वास्को ते हुबळी दरम्यान रद्द राहतील. परिणामी या गाड्यांचा प्रवास हुबळी येथेच आटोपता घेतला जाईल. परतीच्या फेऱ्या देखील हुबळी येथूनच नियोजित वेळेनुसार सुटतील. त्यामुळे गोवा, कर्नाटक आणि दक्षिण भारतात प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

advertisement

दादर-पुणे प्रवाशांचे हाल; हिरकणीसह शिवशाही बसच्या फेऱ्यांमध्ये 78 टक्क्यांची घट, ST प्रशासनानं दिली 3 अजब कारणं

याशिवाय वास्को दा गामा–वेलंकन्नी (17315/16) या साप्ताहिक गाडीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. ही गाडी मडगाव–मंगळुरू–शोरनूर–एरोड मार्गे धावेल. त्यामुळे हुबळी, धारवाड, दावणगेरे, तुमकूर आणि बेंगळुरू परिसरातील महत्त्वाचे थांबे वगळले जाणार आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने या बदलांची अधिकृत घोषणा केली आहे.

advertisement

View More

दीर्घकालीन देखभाल आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. मात्र पर्यटन हंगामातच हे बदल लागू झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गोवा मार्गावरील तिकिटांची मोठी मागणी लक्षात घेता या निर्णयाचा व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली अन् ‘मायमराठी’च्या सेवेत हजर, पुणेकराचं काम पाहाल, तर सलाम कराल, Vid
सर्व पहा

प्रवाशांनी प्रवासापूर्वी अधिकृत संकेतस्थळ, हेल्पलाइन किंवा संबंधित अॅपवर गाड्यांची अद्ययावत माहिती तपासूनच नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वेने दिलगिरीही व्यक्त केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Goa Railway: गोव्याला जायचा प्लॅन बदला, मुंबईतून जाणाऱ्या 8 एक्स्प्रेस रद्द, ट्रेनचे मार्ग बदलले, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल