advertisement

Sharad Pawar: 'सिल्व्हर ओक'वर मध्यरात्री खलबतं! पवारांची उमेदवारी की नवा चेहरा? मविआमध्ये हालचालींना वेग

Last Updated:

Sharad Pawar On Rajya Sabha : स्वतः शरद पवार रिंगणात उतरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच,'सिल्वर ओक'वर रात्री खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे.

'सिल्व्हर ओक'वर मध्यरात्री खलबतं! पवारांची उमेदवारी की नवा चेहरा? मविआमध्ये हालचालींना वेग
'सिल्व्हर ओक'वर मध्यरात्री खलबतं! पवारांची उमेदवारी की नवा चेहरा? मविआमध्ये हालचालींना वेग
मुंबई: महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण कमालीचे तापले आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून स्वतः शरद पवार रिंगणात उतरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच,'सिल्वर ओक'वर रात्री खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीत आता महाविकास आघाडी कायम राहणार की महायुती डाव टाकून सातवी जागा मविआकडून हिसकावून घेणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मध्यरात्री 'सिल्व्हर ओक'वर खलबतं

काल रात्री उशिरा शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी पवार गटाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे हे प्रमुख नेते उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी राज्यसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. नेत्यांनी पवारांना पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याचा आग्रह धरला, मात्र पवारांनी त्यावर कोणतेही स्पष्ट उत्तर न देता मौन पाळणे पसंत केले.
advertisement

पवारांनी काय दिला सल्ला?

स्वतःच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट करण्याऐवजी शरद पवारांनी आपल्या नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. "या जागेबाबत आधी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांशी (ठाकरे गट आणि काँग्रेस) चर्चा करा," असे निर्देश पवारांनी दिले आहेत. यामुळे ही जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार आणि उमेदवार कोण असणार, याचा निर्णय आता मविआच्या सामूहिक चर्चेनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement

पवारांच्या 'मौना'चे राजकीय अर्थ

शरद पवारांनी बाळगलेल्या मौनामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मविआमध्ये केवळ एकच जागा निवडून येण्याइतपत संख्याबळ आहे.त्यावर ठाकरे गटानेही दावा सांगितला आहे. त्यामुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी नको म्हणून पवार सावध भूमिका घेत असावेत, असे म्हटले जात आहे. आता महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय ठरणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar: 'सिल्व्हर ओक'वर मध्यरात्री खलबतं! पवारांची उमेदवारी की नवा चेहरा? मविआमध्ये हालचालींना वेग
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement