TRENDING:

Mumbai Water Supply: मुंबईकरांनो, 4 ते 5 दिवस पाणी गाळून, उकळून प्या! शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

Last Updated:

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता विभागामार्फत वांद्रे पश्चिम येथील पाली हिल जलाशयाच्‍या इनलेटवरील व्‍हॉल्‍व्‍ह दुरूस्‍तीचे काम नियोजित आहे. शनिवार, दिनांक २२ नोव्‍हेंबर २०२५ रोजी हे दुरूस्‍ती कामकाज हाती घेण्‍यात येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता विभागामार्फत वांद्रे पश्चिम येथील पाली हिल जलाशयाच्‍या इनलेटवरील व्‍हॉल्‍व्‍ह दुरूस्‍तीचे काम नियोजित आहे. शनिवार, दिनांक २२ नोव्‍हेंबर २०२५ रोजी मध्‍यरात्री १ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत हे दुरूस्‍ती कामकाज हाती घेण्‍यात येणार आहे. दुरूस्‍ती पूर्ण झाल्‍यानंतर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. मात्र, या दुरुस्तीमुळे ‘एच पश्चिम’ विभागातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्‍यामुळे नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा व काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे नम्र आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.
Mumbai Water Supply: मुंबईकरांनो, 4 ते 5 दिवस पाणी गाळून, उकळून प्या! शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा
Mumbai Water Supply: मुंबईकरांनो, 4 ते 5 दिवस पाणी गाळून, उकळून प्या! शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा
advertisement

कमी दाबाने पाणीपुरवठा होणारा परिसर-

  1. सर्वसाधारण परिक्षेत्र (एच पश्चिम ०१) : दांडपाडा, गजधरबंध झोपडट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ६.३० ते ८.३० वा.) (वेळेत बदल नाही) (कमी दाबाने पाणीपुरवठा)
  2. परिक्षेत्र (एच पश्चिम ०३) : कांतवाडी परिसराचा काही भाग, पालीनाका, पाली गावठाण, शेरली, राजन व माला गावाचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा.) (वेळेत बदल नाही) (तुलनेने कमी दाबाने पाणीपुरवठा)
  3. advertisement

  4. खारदांडा परिक्षेत्र (एच पश्चिम ०६) : खारदांडा काेळीवाडा, दांडपाडा, च्युइम गावठाण, गजदरबंध झोपडट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ५.३० ते रात्री १०.०० वा.) (विस्तारित तास) (कमी दाबाने पाणीपुरवठा)
  5. युनियन उद्यान परिक्षेत्र (एच पश्चिम ०९) पंप परिक्षेत्र ३ सह : हनुमान नगर, लक्ष्मी नगर, युनियन उद्यान मार्ग क्रमांक १ ते ४, पालीहिल आणि च्युइम गावाचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० वा.) (वेळेत बदल नाही) (कमी दाबाने पाणीपुरवठा).
  6. advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुमच्या घरी देखील लहान मुली मेकअप करतात? तर थांबवा, नाहीतर होतील गंभीर परिणाम 
सर्व पहा

‘एच पश्चिम’ विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Supply: मुंबईकरांनो, 4 ते 5 दिवस पाणी गाळून, उकळून प्या! शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल