TRENDING:

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव- मुलुंड लिंक रोड खणण्यासाठी ऑस्ट्रेलियाहून आणली मशीन, केव्हापासून होणार कामाचा श्रीगणेशा?

Last Updated:

Goregaon Mulund Link Road : मुंबईतील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी गोरेगाव- मुलुंड लिंक रोड वाहन चालकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या लिंक रोडमध्ये, गोरेगाव पूर्व येथून ४.७० किमी. लांबीचे दोन भूमिगत बोगदे तयार करण्यात येत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकरांना भेडसावत आहे. मुंबईची वाहतूक कोंडीची समस्या फक्त सामान्य नागरिकांनाच नाही तर, अनेक सेलिब्रिटींसह अनेक राजकीय नेत्यांनाही ही समस्या भेडसावते. मुंबईतील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी गोरेगाव- मुलुंड लिंक रोड वाहन चालकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या लिंक रोडमध्ये, गोरेगाव पूर्व येथून ४.७० किमी. लांबीचे दोन भूमिगत बोगदे तयार करण्यात येत आहेत. मुंबईकरांचा प्रवास अधिकच सुसाट आणि झटपट होण्यासाठी मदत मिळणार आहे.
News18
News18
advertisement

लालबागचा राजाकडून अतिवृष्टीबाधितांना 'एक हात मदतीचा', पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत

गोरेगाव- मुलुंड लिंक रोडचं काम सध्या सुरू आहे. हे महाकाय बोगदे खणण्यासाठी पहिल्या महाकाय टीबीएम मशीनचे (टनेल बोअरिंग मशीन) सुटे भाग दाखल झाले आहेत. तर, दुसऱ्या टीबीएम मशीनचे सुटे भाग येत्या नोव्हेंबरपर्यंत दाखल होतील. साधारण चार मजली उंच अशा महाकाय टीबीएम (टनेल बोअरिंग मशीन) मशीनने बोगदा खणण्याचे काम पुढच्या वर्षाच्या पावसाळ्याआधीच काम सुरू करण्याचे मानस मुंबई महापालिकेचे आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलुंड लिंक रोड तब्बल 12.20 किमीचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

advertisement

सोलापूर-विजापूर महामार्गावरील वाहतूक 30 तासांपासून बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा

या प्रकल्पांतर्गत पश्चिम उपनगरामध्ये गोरेगावमध्ये असणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरी ते पूर्व उपनगरांतील मुलुंड येथील खिंडीपाडापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. एकमेकांना समांतर असलेल्या सारख्या अंतराचे प्रत्येकी ४.७० किमीचे असणार आहेत. हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या डोंगराखाली पूर्णपणे जमिनीखालून जाणार आहे. या भूमिगत बोगद्यामध्ये शिरण्यासाठी चित्रनगरी परिसरामध्ये पेटी बोगदाही बांधण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन तो पूर्ण करण्यात येणार आहे.

advertisement

महाराष्ट्रावर संकटाचे ढग गडद, वादळी पाऊस होणार; 33 जिल्ह्यांना अलर्ट

बोगद्याचे खोदकाम करण्यासाठी ऑस्ट्रेलियन कंपनीकडून दोन महाकाय टीवीएम मशीन घेण्यात आले आहेत. मशीन जोडून प्रथम त्याची सर्व तपासणी करण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल आणि ऑगस्ट २०२६ पासून बोगद्याच्या कामाला सुरुवात करण्याचे कंत्राटदाराचे नियोजन आहे. तरीही पावसाळ्याआधी काम सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Goregaon Mulund Link Road : गोरेगाव- मुलुंड लिंक रोड खणण्यासाठी ऑस्ट्रेलियाहून आणली मशीन, केव्हापासून होणार कामाचा श्रीगणेशा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल