Solapur River Floods : सोलापूर-विजापूर महामार्गावरील वाहतूक 30 तासांपासून बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना नदीतून 2 लाख क्यूसेक्सपेक्षा जास्त पाणी वाहत असल्याने सोलापूर विजयपूर महामार्गावर सिना नदीचं पाणी आल्याने सोलापूर - विजयपूर महामार्गावरील वाहतूक 30 तासांपासून बंद आहे.
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना नदीतून 2 लाख क्यूसेक्सपेक्षा जास्त पाणी वाहत असल्याने सोलापूर विजयपूर महामार्गावर सिना नदीचं पाणी आल्याने सोलापूर - विजयपूर महामार्गावरील वाहतूक 30 तासांपासून बंद आहे. सोलापूर- विजयपूर महामार्गावरील दोन्ही बाजूला नदीचं पाणी साचल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सिना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर - विजयपूर महामार्ग संपूर्ण पाण्याखाली गेल्याने या महामार्गावरील वाहतूक 30 तासांपासून बंद आहे.सीना नदीच्या पाण्याची पातळी जो पर्यंत कमी होत नाही तो पर्यंत सोलापूर - विजयपूर महामार्ग प्रशासनाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.पोलिसांनी बॅरीकेट्स लाऊन हा महामार्ग बंद केला आहे.त्यामुळे सोलापूर - विजयपूर महामार्गावर वाहणांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला होता.
advertisement
त्यातच कोळेगाव येथील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने सिना नदीचा प्रवाह मोठया प्रमाणात वाढला आहे. सीना नदीला महापूर आल्याने सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच सोलापूर - कोल्हापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आज सकाळपासून दोन्ही महामार्गांवरून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तर सोलापूर- पुणे या राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवस वाहतूक थांबून असल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून वाहनांचे दोन ते तीन किलोमीटर रांगा लागल्या आहेत. सोलापूर - विजयपूर महामार्गावर आलेला सीना नदीचं पाणी कमी होत नाही, तोपर्यंत या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 25, 2025 7:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur River Floods : सोलापूर-विजापूर महामार्गावरील वाहतूक 30 तासांपासून बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा