Success Story: शहापूरच्या मातीतला हिरा आयपीएलचं मैदान गाजवणार, सनरायझर्स हैदराबादने खरेदी केलेला शेरे गावचा ओमकार तारमळे कोण?

Last Updated:
Omkar Tarmale Success Story: ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी घटना घडली आहे. स्थानिक रहिवासी शेरे गावचे शेतकरी तुकाराम तारमाळे यांचा मुलगा ओंकार तारमाळे वयाच्या २३ वर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या हंगामात IPL 2026 साठी नुकतीच निवड झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद या संघातून खेळणारा असल्याने लवकरच तो देशातील दिग्गज खेळाडूसोबत मैदान गाजवणार आहे.
1/5
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून स्थानिक रहिवासी शेरे गावचे शेतकरी तुकाराम तारमाळे यांचा मुलगा ओंकार तारमाळे वयाच्या २३वर्षात इंडियन प्रीमियर लीग IPL 2026 साठी नुकतीच निवड झाली आहे. हैद्राबाद या संघातून खेळणारा असल्याने लवकरच तो देशातील दिग्गज खेळाडू सोबत मैदान गाजवणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी घटना घडली आहे. स्थानिक रहिवासी शेरे गावचे शेतकरी तुकाराम तारमाळे यांचा मुलगा ओंकार तारमाळे वयाच्या २३ वर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या हंगामात IPL 2026 साठी नुकतीच निवड झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद या संघातून खेळणारा असल्याने लवकरच तो देशातील दिग्गज खेळाडूसोबत मैदान गाजवणार आहे.
advertisement
2/5
ओमकार यांचे वडील तुकाराम तारमले हे साधे शेतकरी, कष्टकरी व्यक्तिमत्त्व. मुलाच्या क्रिकेटसाठी लागणारा खर्च-प्रवास, किट, प्रशिक्षण आणि स्पर्धा-हे सगळं उभं करणं त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. एका टप्प्यावर ओमकार यांना महत्त्वाच्या क्रिकेट संधीसाठी बाहेरगावी जायचं होतं, पण त्या वेळी हाताशी पुरेसे पैसे नव्हते. मात्र वडिलांनी हार न मानता. महिलां बचत गटाकडून ₹3 लाखांचं कर्ज घेतलं.समाजातील महिलांनी दाखवलेला हा विश्वास आणि वडिलांचा हा धाडसी निर्णय ओमकार यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरला.
ओमकार यांचे वडील तुकाराम तारमले हे साधे शेतकरी, कष्टकरी व्यक्तिमत्त्व. मुलाच्या क्रिकेटसाठी लागणारा खर्च- प्रवास, किट, प्रशिक्षण आणि स्पर्धा हे सगळं उभं करणं त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. एका टप्प्यावर ओमकारला महत्त्वाच्या क्रिकेट संधीसाठी बाहेरगावी जायचं होतं, पण त्या वेळी हाताशी पुरेसे पैसे नव्हते. मात्र वडिलांनी हार न मानता गावातील महिला बचत गटाकडून 3 लाख रूपयांचं कर्ज घेतलं. समाजातील महिलांनी दाखवलेला हा विश्वास आणि वडिलांचा हा धाडसी निर्णय ओमकार यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरला.
advertisement
3/5
ओमकार यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग केला सातत्यपूर्ण मेहनत, वेगवान गोलंदाजी आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर त्यांनी निवड समित्यांचं लक्ष वेधून घेतलं. संघर्ष, अपयश आणि तीव्र स्पर्धेला सामोरं जात त्यांनी स्वतःला सातत्यानं सिद्ध केलं. एकीकडे कुटुंबावर कर्जाचं ओझं होतं, तर दुसरीकडे स्वतःवर अपेक्षांचं दडपण तरीही ओमकार यांची मेहनत कधीच कमी झाली नाही.
ओमकार यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग केला. सातत्यपूर्ण मेहनत, वेगवान गोलंदाजी आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर त्याने निवड समित्यांचं लक्ष वेधून घेतलं. संघर्ष, अपयश आणि तीव्र स्पर्धेला सामोरं जात ओमकारने स्वतःला सातत्यानं सिद्ध केलं. एकीकडे कुटुंबावर कर्जाचं ओझं होतं, तर दुसरीकडे स्वतःवर अपेक्षांचं दडपण तरीही ओमकारची मेहनत कधीच कमी पडली नाही.
advertisement
4/5
अतिशय ग्रामीण भाग, मर्यादित सुविधा आणि आर्थिक अडचणी असूनही ओमकार यांना लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती. गावातील मोकळ्या मैदानावर, कधी टेनिस बॉलने तर कधी जुन्या चेंडूने, त्यांनी क्रिकेटचा सराव सुरू केला. त्यांची मेहनत, शिस्त आणि चिकाटी पाहून कुटुंबाने त्यांच्या स्वप्नाला पूर्ण पाठिंबा दिला.
ग्रामीण परिसर, मर्यादित सुविधा आणि आर्थिक अडचणी असूनही ओमकारला लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती. गावातील मोकळ्या मैदानावर, कधी टेनिस बॉलने तर कधी जुन्या चेंडूने, त्याने आपला क्रिकेटचा सराव कायम ठेवला. त्यांची मेहनत, शिस्त आणि चिकाटी पाहून कुटुंबाने त्यांच्या स्वप्नाला पूर्ण पाठिंबा दिला.
advertisement
5/5
ओमकार तारमले यांची उंच भरारी एक महत्त्वाचा धडा देते- स्वप्न पाहणं आवश्यक असतं, पण त्या स्वप्नासाठी झगडणं त्याहूनही महत्त्वाचं असतं. पैसा नसतो तेव्हा जिद्द लागते, ओळखी नसतात तेव्हा मेहनत बोलते. आज ओमकार यांची ओळख आयपीएल खेळाडू म्हणून झाली आहे.
ओमकार तारमले यांची उंच भरारी एक महत्त्वाचा धडा देतो. स्वप्न पाहणं आवश्यक असतं, पण त्या स्वप्नासाठी झगडणं त्याहूनही महत्त्वाचं असतं. पैसा नसतो तेव्हा जिद्द लागते, ओळखी नसतात तेव्हा मेहनत बोलते. आज ओमकारची ओळख आयपीएल खेळाडू म्हणून झाली आहे.
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement