RSS च्या बालेकिल्ल्यात भाजपकडून आयारामांना पायघड्या, इच्छुक निष्ठावंत संतापले, सावरकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन

Last Updated:

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यात इतर पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे कळाल्यानंतर इच्छुकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकासमोर आंदोलन केले.

पिंपरी चिंचवड भाजपमधील कार्यकर्ते नाराज
पिंपरी चिंचवड भाजपमधील कार्यकर्ते नाराज
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आयारामांना पायघड्या घालण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस आहे. पिंपरी चिंचवडमध्येही भारतीय जनता पक्षातील संभाव्य पक्ष प्रवेशावरून निष्ठावंतांमध्ये नाराजीची वाट आहे. शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यात इतर पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे कळाल्यानंतर इच्छुकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकासमोर आंदोलन केले.
पक्षातील निष्ठावंतांना बाजूला सारून आयारामांना उमेदवारी देण्याचे काम अनेक निवडणुकांत होते. यंदाही महापालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर तुल्यबळ आव्हान निर्माण करण्याकरिता थेट उपमहापौर राहिलेले राजू मिसाळ यांना फोडण्याची भाजपची रणनीती आहे. तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक अमित गावडे यांनाही प्रवेश देण्याचे भाजपचे नियोजन आहे.

कोणत्या संभाव्य पक्षप्रवेशावरून नाराजीनाट्य?

त्यामुळेच पिंपरी चिंचवड मध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी आत्मक्लेष आंदोलन केले. राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर राजू मिसाळ, त्याचबरोबर शिवसेनेचे माजी नगरसेवक अमित गावडे यांच्या संभाव्य पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकासमोर भाजपचे इच्छुक उमेदवार आंदोलनाला बसले आहेत.
advertisement

भाजपने आयारामांना प्रवेश दिला तर बंडखोरी करून निवडणूक लढवणार

आपल्या विरोधानंतरही जर भाजपने आयारामांना प्रवेश दिला तर बंडखोरी करून निवडणूक लढवणार असल्याचा इशाराही या इच्छुक नेत्यांनी दिल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. आंदोलन करणारे हे सगळे इच्छुक पिंपरी शहरातील RSS चा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या प्रभाग क्रमांक १५ मधील संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे इतर पक्षातील नेत्यांना संधी देऊन बेरजेचे गणित करायचे की आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना उमेदवारी द्यायची, असा यक्षप्रश्न भाजपसमोर आहे.
advertisement

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने

पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती होणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेटपणे जाहीर केले आहे. आम्ही जर एकत्रित लढलो तर प्रतिस्पर्धी पक्षाला त्याचा फायदा होईल, त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दोन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढाई होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
RSS च्या बालेकिल्ल्यात भाजपकडून आयारामांना पायघड्या, इच्छुक निष्ठावंत संतापले, सावरकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement