Rohit Sharma VIDEO : 'अश्विन काय फेकतो त्यालाच माहित नसतं', रोहितच्या गुगलीवर स्पिनर क्लिन बोल्ड, खतरनाक रिॲक्शन व्हायरल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
व्हिडिओमध्ये त्याने टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपट्टू आर अश्विनची फिरकी घेतली होती.याच फिरकीवर आता आर अश्विनने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Sharma R Ashwin : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये न्यूझीलंड दौऱ्यासाठीची तयारी करतो आहे. या तयारी दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपट्टू आर अश्विनची फिरकी घेतली होती.याच फिरकीवर आता आर अश्विनने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
खरं तर रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आर अश्विनबाबत बोलतो. आर अश्विन हा स्किलफुल गोलंदाज आहे, तो कुठला बॉल टाकतो ते त्याला देखील माहिती नसतं, हे सगळे बॉल ऋद्धिमान साहाने पकडले असल्याचे रोहित शर्मा व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.
advertisement
🤣🤣 Rohit being Rohit!
Aaj tak mujhe bhee nahin pata ki maine kausee gendh phenkee.
Jokes apart ! What a keeper Saha was 🔥🔥 https://t.co/mnn5l5pSbF
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) December 19, 2025
रोहितच्या या विधानावर आता आर अश्विनने प्रतिक्रिया दिली आहे. रोहित हा रोहितच आहे. आणि आजपर्यंत मला देखील माहिती नाही आहे मी कोणता बॉल टाकला आहे, हा जोकचा भाग झाला पण ऋद्धिमान साहा खूपचा चांगला विकेटकिपर आहे, असे आर अश्विन एक्सवर सांगतो.
advertisement
दरम्यान या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा ऋद्धिमान साहाच्या विकेटकिंपिंगच कौतुक करत आहे.हे कौतुक करत असताना रोहित शर्मा सांगतो, आम्ही टेस्ट मॅच एकत्र खेळलो, भारतात खेळलो आहे आणि भारताबाहेर देखील खेळलो आहे. तो विकेटकिंपिग करत असताना मी त्याच्यासोबत स्लिपमध्ये देखील उभा राहिलो आहे. साहाच्या समोर मी दोन-तीन कॅच पकडल्या आहेत, त्याने माझ्यासमोर 2-3 कॅच पकडल्या आहेत. पण असा किपर आम्ही भारतात कधीच पाहिला नाही, भारताचा तो सर्वात बेस्ट किपर आहे, असे कौतुक रोहित शर्मा करतो.
advertisement
हे नुसतं माझ्या बोलण्याने सिद्ध होत नाही तर तुम्ही आमचे सामने देखील पाहिले असतील त्यात तुम्हाला दिसून येईल. इंडियात बॉल इतका फिरतो, त्यात किंपिंग करणे फारसे सोप्पे नसते. तसेच जडेला एक बॉलर आहे जो वेगाने बॉल टाकतो. त्याच्यासोबत अश्विन देखील आहे , तो इतका स्किलफूल आहे, वरून बॉल टाकतो, कॅरम बॉल टाकतो,कुठला बॉल टाकतो त्याला देखील माहिती नसतं, हे सगळे बॉल साहाने पकडले आहेत, असे रोहित शर्मा शेवटी साहाचे कौतुक करताना म्हणतो.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 5:03 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma VIDEO : 'अश्विन काय फेकतो त्यालाच माहित नसतं', रोहितच्या गुगलीवर स्पिनर क्लिन बोल्ड, खतरनाक रिॲक्शन व्हायरल









