मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना युतीचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपाला थेट 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे ठरलेल्या वेळेत युतीबाबत स्पष्ट निर्णय न झाल्यास आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ, असा इशाराच सरनाईक यांनी दिला आहे.
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी युतीसाठी काही अटी मांडल्या होत्या. त्यामध्ये ‘शिवार गार्डन’ परत देणे आणि भाजपाचे जे कार्यकर्ते शिवसेनेत घेतले गेले आहेत, ते परत करणे या प्रमुख अटींचा समावेश होता.या संदर्भात बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, शिवार गार्डन ज्या वेळी देण्यात आले होते, त्या कागदपत्रांवर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याच सह्या आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर गैरसमज पसरवला जात आहे.भाजपाने मांडलेल्या अटी मान्य करण्यास आम्ही तयार आहोत, मात्र, “आमचे जे पदाधिकारी भाजपाने आपल्या पक्षात घेतले आहेत, ते आम्हाला परत देण्यात यावेत,” अशी स्पष्ट अट त्यांनी मांडली.
advertisement
दरम्यान, या घडामोडींमुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण तापले असून पुढील 24 तासांत भाजप काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून युती टिकणार की तुटणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
