कुठे आहे हे नवीन स्टेशन?
हे नवं स्टेशन नेरूळ-बेलापूर-उरण रेल्वे प्रकल्पाचा भाग असून या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 3,064 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या खर्चामध्ये CIDCO आणि मध्य रेल्वेचाही सहभाग आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील रेल्वे दळणवळण अधिक मजबूत झालं आहे.
नेमकं हे स्टेशन आहे तरी कोणतं?
नेरूळ, बेलापूर, उरण परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार हे स्टेशन म्हणजे गव्हाण रेल्वे स्टेशन आहे. विशेषतहा जळसई, चिरले आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांसाठी हे स्टेशन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
advertisement
विमानतळ गाठणं आता सोपं
आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असल्यामुळे आता प्रवाशांना रेल्वेने थेट स्टेशनपर्यंत येऊन कमी वेळात विमानतळ गाठता येणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास कमी होईल आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. गव्हाण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन रुंद प्लॅटफॉर्म, तिकीट खिडक्या, लिफ्ट, सरकते जिने आणि पादचारी पूल यांचा समावेश आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांनाही सहज प्रवास करता येणार आहे.
पूर्वी नेरूळ-उरण मार्गावर प्रवास करताना गर्दी, रांगा आणि वेळेही जास्त प्रमाणात वाया जात होता. मात्र गव्हाण स्टेशन सुरू झाल्यानंतर या अडचणी कमी होऊन प्रवास अधिक आरामदायी आणि सुलभ होणार आहे.
