TRENDING:

Navi Mumbai Crime: '25 दिन में पैसा डब्बल...' एकाने 72 लाख गमावले तर बँक मॅनेजरलाही 19 लाखांना लुटले!

Last Updated:

नवी मुंबईतील बेलापूरमध्ये राहणाऱ्या 56 वर्षीय कर्ज सल्लागाराची क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल 72.7 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील बेलापूरमध्ये राहणाऱ्या 56 वर्षीय कर्ज सल्लागाराची (Loan Consultant) क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल 72.7 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणुकीच्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सोमवारी पोलिसांनी दिली.
सायबर क्राइम
सायबर क्राइम
advertisement

बेलापूरमध्ये राहत असलेल्या या व्यक्तीला काही अज्ञात व्यक्तींनी USDT (Tether) या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. आरोपींनी क्रिप्टो ट्रेडिंगमधून भरघोस नफा मिळेल, असे आश्वासन देत पीडिताचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मे 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत विविध संकेतस्थळांद्वारे दिलेल्या खात्यांमध्ये पीडिताने मोठी रक्कम जमा केल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला माहिती दिली.

advertisement

56 वर्षीय व्यक्तीने आरोपींच्या बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्या व्यक्तीच्या लक्षात आले की, आपला मोबाईल क्रमांक त्यांनी ब्लॉक केला आहे. ब्लॉक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. शिवाय, गुंतवणूक प्लॅटफॉर्मवरूनही ब्लॉक केले. पोलिसांनी रविवारी पाच अज्ञात व्यक्ती आणि तीन वेब प्लॅटफॉर्म्सविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4) (फसवणूक), 319(2) (तोतयागिरी करून फसवणूक) आणि 3(5) (सामायिक हेतू) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

advertisement

HR मॅनेजरची 36 लाखांना फसवणूक

दरम्यान, नवी मुंबईतच आणखी एका प्रकरणात एका HR मॅनेजरची 36.74 लाख रुपयांची ऑनलाईन गुंतवणूक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकार्‍याने रविवारी दिली. नेरुळ पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने स्वतःला सेबी- नोंदणीकृत कंपनीची प्रतिनिधी असल्याचे सांगत HR मॅनेजरसोबत संपर्क साधला. त्यानंतर त्याला शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळेल, असे सांगून एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. आरोपींनी दिलेल्या लिंकवरून पीडिताने एक ॲप डाऊनलोड केले. सुरुवातीला 50 हजार रुपयांचे प्रॉफिट दाखवण्यात आल्यानंतर त्या व्यक्तीने ऑगस्ट ते सप्टेंबर 2025 या कालावधीत एकूण 36.74 लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, नफा काढण्याचा प्रयत्न करताच पैसे मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले, अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी दिली. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात विश्वासघात, फसवणूक तसेच भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

advertisement

बँक मॅनेजरची फसवणूक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Toyota ची धाकड MPV, 23 किमी मायलेज अन् सेफ्टीमध्ये टँकसारखी दणकट, किंमत किती?
सर्व पहा

ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे एका बँक मॅनेजरची 19.86 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. उच्चभ्रू ग्राहक असल्याचे भासवून आरोपीने फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. 2 जानेवारी रोजी बँक मॅनेजरला एका व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने स्वत:ची ओळख विनायक बिल्डर्सचे नरेश राजपूत अशी करून दिली. त्या बिल्डरने त्याच्याकडे मुदत ठेव (FD) करण्याची इच्छा व्यक्त केली. बँक मॅनेजरला त्या व्यक्तीने 2 कोटी रुपयांची मुदत ठेव (FD) करण्याची इच्छा व्यक्त करत RTGS व्यवहारासाठी मदत मागितली, अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. आरोपीने बिल्डरच्या कंपनीचे लेटरहेड असलेला बनावट ई- मेल देखील पाठवला. त्यावर विश्वास ठेवून बँक मॅनेजरने 19.86 लाख रुपयांचा RTGS व्यवहार केला. मात्र, नरेश राजपूतने बँकेत जाऊन या व्यवहाराची चौकशी केली असता त्याची फसवणूक झाल्याचे समोर आले. पीडिताने आरोपीशी फोनवर बोलण्याची व्यवस्था करून दिली असता, आरोपीने अचानक कॉल कट केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक आणि इतर कलमांखाली भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai Crime: '25 दिन में पैसा डब्बल...' एकाने 72 लाख गमावले तर बँक मॅनेजरलाही 19 लाखांना लुटले!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल