ठरवलेल्या या ठिकाणाहून 14 जानेवारी रोजी मतदानासाठी आवश्यक साहित्य आणि मतदान पेट्यांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदान पेट्या आणि साहित्य पुन्हा याच स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये तसेच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
कुठून अन् कुठले मार्ग असतील बंद
कोपरखैरणे येथून वाशी रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक ब्ल्यू डायमंड चौक ते बेसीन कॅथोलिक बँक चौक या मार्गावर बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच कॅथोलिक बँक चौक ते परफेक्ट सिरॅमिक समोर, आयडीबीआय बँक चौक या मार्गावरही वाहतूक बंद असणार आहे.
या मार्गावर जाणाऱ्या वाहनांना कोपरी सिग्नल आणि पाम बीच रोड मार्गे पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे तसेच वाशीहून कोपरखैरणेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठीही हाच पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मतदान काळात नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
