TRENDING:

Eknath Khadse : नवाब मलिक खडसेंच्या भेटीला रुग्णालयात, मागे सुरू होती 'बनवाबनवी', Photo Viral

Last Updated:

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 10 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सौम्य हृदयविकाराचा धक्का आल्यामुळे त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याला कारण आहे खडसेंच्या रुग्णालयातल्या खोलीत असलेला टीव्ही. या टीव्हीवर मराठीमधला सगळ्यात सुपरहिट चित्रपट अशी ही बनवाबनवी सुरू आहे.
नवाब मलिक खडसेंच्या भेटीला रुग्णालयात, मागे सुरू होती 'बनवाबनवी', Photo Viral
नवाब मलिक खडसेंच्या भेटीला रुग्णालयात, मागे सुरू होती 'बनवाबनवी', Photo Viral
advertisement

खडसेंची प्रकृती स्थिर

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठी अपडेट दिली आहे. एकनाथ खडसे यांची प्रकृती उत्तम आहे, त्यांना बरं वाटत आहे. कदाचित परवा त्यांना डिसचार्ज मिळेल असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. दरम्यान काल छगन भुजबळही खडसेंना भेटून आले.

advertisement

प्रकृती अस्वास्थ्यामुळे नवाब मलिक यांनाही उपचारासाठी जामीन मिळाला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी सुप्रीम कोर्टाने जामीन दिला. फक्त वैद्यकीय कारणास्तवच जामीन दिला जात असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं, तसंच ईडीनेही न्यायालयामध्ये नवाब मलिकांच्या जामिनाला विरोध केला नाही, त्यामुळे दीड वर्षानंतर नवाब मलिक यांना जामीन मिळाला. नवाब मलिक यांची एक किडनी निकामी झाली आहे, तर दुसरी किडनी 60 टक्के काम करत आहे, पण कोणतंही छोटं इनफेक्शन झालं तर त्यांची दुसरी किडनीही निकामी होऊ शकण्याची भीती वर्तवण्यात आली होती.

advertisement

33 वर्षानंतरही अजरामर चित्रपट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

1988 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट विनोदी डायलॉग्स आणि भन्नाट अभिनय यामुळे 33 वर्षांनंतरही पोट धरून हसायला भाग पाडतो. या चित्रपटातील ‘आमच्या शेजारी राहते. नवऱ्याने टाकलंय तिला…’, ‘सारखं सारखं एकाच झाडावर काय?’, ‘सत्तर रुपये वारले’ अशे अनेक संवाद आजही रसिकांच्या जीभेवर रेंगाळताना दिसतात. परंतु यामधील “धनंजय माने इथंच राहतात का?” या संवादानं खऱ्या अर्थानं कमाल केली. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या भन्नाट टाईमिंगनं हा डॉयलॉग अजरामर केला. या चित्रपटाच्या डायलॉग्सचे मीम्सही प्रचंड प्रमाणावर व्हायरल होतात, त्यामुळे आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला तरी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रभर पाहिला जातो.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Eknath Khadse : नवाब मलिक खडसेंच्या भेटीला रुग्णालयात, मागे सुरू होती 'बनवाबनवी', Photo Viral
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल