TRENDING:

चर्चा तर होणारच! उद्धव ठाकरेंचे खास मिलिंद नार्वेकरांच्या घरी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपाल पोहोचले

Last Updated:

नार्वेकर यांच्या घरी गणरायांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उपराष्ट्रपती पदाचे NDA चे उमेदवार सी पी राधाकृष्णन आले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यभरात सध्या वातावरण गणेशमय झालं आहे. सर्वसामान्यांच्या घरापासून ते राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहे. राजकीय नेत्यांच्या घरी नेत्यांची ये जा सुरू आहे. अशातच आता  शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या घरी NDA चे नेते पोहोचले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे.
News18
News18
advertisement

शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा खास माणूस म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर आमदार झाले आहे. नार्वेकर यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे. अशातच  नार्वेकर यांच्या घरी गणरायांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उपराष्ट्रपती पदाचे NDA चे उमेदवार सी पी राधाकृष्णन आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा नार्वेकर यांच्या घरी पोहोचले होते.

advertisement

एवढंच नाहीतर संध्याकाळी शिवसेनेचे लोकसभा गट नेते खासदार डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांनीही शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या घरच्या गणरायाचं दर्शन घेतलं. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या घरी NDA च्या नेत्यांची उपस्थितीमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची भुवया उंचावणाऱ्या ठरल्या आहेत.  विशेष म्हणजे, मिलिंद नार्वेकर यांच्या सर्वपक्षीयांसोबत चांगलेच संबंध आहे. त्यामुळे एनडीएच्या नेत्यांनी नार्वेकर यांच्या घरी भेट दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

advertisement

कोण आहे मिलिंद नार्वेकर?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

मिलिंद नार्वेकर हे  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहे.  ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जातात. तसंच ते शिवसेनेचे (UBT) सचिव आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये आणि पक्षाच्या निर्णयांमध्ये पडद्यामागील रणनीतिकार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
चर्चा तर होणारच! उद्धव ठाकरेंचे खास मिलिंद नार्वेकरांच्या घरी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपाल पोहोचले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल