TRENDING:

Narender Surrender: काँग्रेसनं 'नरेंदर सरेंडर' म्हणणं लोकांनी नाकारलं, सर्व्हेची आकडेवारी समोर

Last Updated:

काँग्रेसकडून 'नरेंदर सरेंडर' अशी बोचरी टीका केली जात आहे आणि याच विषयी न्यूज१८ लोकमतनं एक सर्वे केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला. पण, ऑपरेशन सिंदूरवरून राजकीय आखाडा तापला. ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ले सुरू केले आहेत. मोदींवर टीका करताना काँग्रेसला जणू नैतिकतेचा विसर पडला आहे. काँग्रेसकडून 'नरेंदर सरेंडर' अशी बोचरी टीका केली जात आहे. आणि याच विषयी न्यूज१८ लोकमतनं एक सर्वे केला आहे. 'नरेंदर सरेंडर' या काँग्रेसच्या घोषणेवर जनतेला काय वाटतंय? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
News18
News18
advertisement

या सर्वेमध्ये सर्वसामान्यांना पाच प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात लोकांना सहभाग घेऊन आपलं मत नोंदवलं. या सर्वेमध्ये एकूण 14,671 लोकांनी आपली मतं नोंदवली होती.  या सर्वेसाठी न्यूज१८ लोकमची वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच टेलिव्हिजनवर क्यूआर कोडचा वापर करण्यात आला होता. ६ आणि ७ जून दरम्यान हा सर्वे घेण्यात आला होता.

advertisement

राहुल गांधींच्या वक्तव्यावर 'न्यूज18 लोकमत'चा सर्व्हे 

1) 'नरेंदर सरेंडर' असं संबोधन कितपत योग्य?

होय - 12.45 टक्के

नाही - 87.55 टक्के

2) पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक शाब्दिक हल्ला करून देशाच्या संरक्षणाशी तडजोड केली जातेय का?

होय - 75.65 टक्के

नाही - 24.35 टक्के

3) पंतप्रधान मोदींनी देशाच्या संरक्षणासंदर्भात नेहमीच सक्षम आणि कठोर भूमिका घेतली आहे का?

advertisement

होय - 88.06 टक्के

नाही - 11.49 टक्के

4) काँग्रेस अशा प्रकारचं विधान करून खरंच भारतीय सैन्याचा आदर करतेय का?

होय - 13.73 टक्के

नाही - 86.27 टक्के

5) जवाहरलाल नेहरूंनी अयुब खान यांच्यासोबत सिंधू करार करून देशहित पाकसमोर सरेंडर केलं होतं. हा भाजपचा आरोप योग्य आहे का?

होय - 83.38 टक्के

advertisement

नाही - 16.62 टक्के

मराठी बातम्या/मुंबई/
Narender Surrender: काँग्रेसनं 'नरेंदर सरेंडर' म्हणणं लोकांनी नाकारलं, सर्व्हेची आकडेवारी समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल