या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया दिनांक 29 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होऊन 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे policerecruitment2025.mahait.org तसेच www.mahapolice.gov.in उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
भरतीसंदर्भातील सर्व अटी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक चाचणी निकष, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना सुचविण्यात येते की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
advertisement
पालघर जिल्हा पोलीस दलातील ही भरती संधी युवकांसाठी मोठी संधी मानली जात आहे. राज्यातील तरुणांना पोलिस सेवेत सामील होऊन समाजसेवेची संधी मिळणार असून ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन माध्यमातून पार पाडली जाणार आहे. अर्जदारांनी नियोजित मुदतीत अर्ज सादर करून शारीरिक आणि लेखी परीक्षेसाठी तयारी ठेवावी असे आवाहन पोलीस अधीक्षक पालघर यांनी केले आहे.
