ज्यादिवशी गौरीची हत्या झाली तेव्हा...
गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. गौरी हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा संशय गौरीच्या माहेरच्या मंडळींनी बोलून दाखवला. अशातच एका वृत्तवाहिनीशी बोलताना करुणा मुंडे यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. गौरी यांची ज्यादिवशी हत्या झाली, त्या दिवशी मलाही रात्री 12 च्या दरम्यान फोन आला होता, असं करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.
advertisement
पोलीस तक्रार दाखल करुन घेत नाहीत
मला फोनवर गौरीच्या एका नातेवाईकांनी सांगितलं की, पोलीस तक्रार दाखल करुन घेत नाहीत. मग तेव्हा मी सांगितलं की मला पोलिसांशी बोलणं करुन द्या, मी त्यांना तक्रार दाखल करुन घ्या असं सांगितलं होतं, अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली. या प्रकरणामागे कोण कोण आहे? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रात महिलांची काय अवस्था आहे, हे सर्वजण उघड्या डोळ्यांनी दिसत आहे.
आत्महत्या नसून हत्या - करुणा मुंडे
बीडमध्ये महिलांची परिस्थिती इतकी बिकट आहे की शाररिक, मानसिक आणि आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. तरीही शासन काही दखल घेत नाही. ही आत्महत्या नसून हत्या आहे, असं करुणा मुंडे यांनी सांगितलं. मी कुटूंबियांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
पंकजा मुंडेंची भूमिका काय?
दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी साडे सहा ते पावणे सातच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
