मेट्रो 2अ आणि 7 च्या मार्गिकेवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो बंद पडली आहे. यासोबतच मेट्रोच्या एसीमध्येही बिघाड झाल्याचे वृत्त आहे. मेट्रो रेल्वे स्थानकांवर नोकरदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. पश्चिम उपनगरातील प्रमुख मेट्रो मार्गांमध्ये या मार्गांची गणती केली जाते. ऐन रहदाराच्या काळातच मेट्रोची तारांबळ उडाल्यामुळे नोकरदारांना पुढे घरी जाण्यासाठी वेळ होणार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अंधेरी- दहिसर मार्गावरील मेट्रोमध्ये बिघाड झाल्याचे वृत्त आहे. मेट्रो प्रशासनाकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असून अद्यापही मेट्रो सेवा सुरळीत सुरू झालेली नाही. मेट्रो सेवा सुरळीत होण्यासाठी किती वेळ लागेल, हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.
advertisement
दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनो मार्गिकेवरील दोन गाड्यांमध्ये 5 ऑगस्ट रोजी सकाळी बिघाड झाला. परिणामी प्रवाशांना अर्धा ते एक तास ताटकळावे लागले. या प्रकाराबाबत प्रवाशांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती.