पॉड टॅक्सी प्रकल्प सुरुवातील कुर्ला-वांद्रेमध्ये सुरुवात होणार होती पण आता या पाठोपाठ ही सेवा ठाणे,नवी मुंबई, मीरा-भाईंदरमधील नागरिकांना मिळणार आहे. पॉड टॅक्सी ही चालकविरहित चालवणार असून या टॅक्सीत साधारण 3 ते 6 प्रवासी वाहून नेता येतात.
पॉड टॅक्सीही 'मुंबई वन कार्ड'मध्ये समाविष्ट
मुंबई शहरात लोकल ट्रेन, मेट्रो आणि बस या तिन्ही साधनांचा वापर करुन मुंबई अन् उपनगरातील नागरिक दररोज प्रवास करतात. अनेकदा एका ठिकाणी जाण्यासाठी तिन्ही साधनांचा वापर केला जातो. त्या वेळी नागरिकांना तिकीट काढण्यासाठी जास्त वेळ नको जायला, त्यामुळे 'मुंबई वन कार्ड'ची सुरुवात केली होती. मात्र आता या पाठोपाठ मुंबईत सुरू होणाऱ्या पॉड टॅक्सी प्रकल्पाला आता मुंबई वन कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच या कार्डवरूनही पॉड टॅक्सीचे तिकीट काढता येणार आहे
advertisement
यामुळे भविष्यात पॉड टॅक्सी सेवा सुरू झाल्यावर वेगळे तिकीट काढण्याची गरज भासणार नाही. एकाच कार्डचा वापर करून प्रवाशांना पॉड टॅक्सीचे तिकीटही सहज उपलब्ध होईल.
