नेमकं घडलं काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने ऑनलाईन ऑर्डरद्वारे 7 हजार 590 डॉलर्सची मागणी केली होती. या रकमेची भारतीय किंमत सुमारे 6 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. त्यानुसार सलमान आणि त्याचा सहकारी दिलेल्या पत्त्यावर 7 हजार 590 डॉलर्स घेऊन पोहोचले.
वर्दीचा गैरवापर अन् सलमानला टार्गेट
सलमानला हिरानंदानी गार्डन येथील समरसेट बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक 303 मध्ये बोलावलं होतं, मात्र वॉचमनकडून समजलं की तो फ्लॅट त्या बिल्डिंगमध्ये अस्तित्वातच नाही. त्यानंतर सलमान आणि त्याचा सहकारी बाहेर येताच दोन इसमांनी त्यांना घेरले. सलमानकडे पैसे असल्याने सहकारी अरमान ने सलमानला आत जाण्याचा इशारा केला आणि तो पुन्हा बिल्डिंगमध्ये गेला. मात्र आत सलमानला आणखी दोन जणांनी घेरले. त्यांनी गळ्यातील पट्ट्यावर ''महाराष्ट्र'' असं लिहिलेलं आयडी कार्ड दाखवत आम्ही पोलीस असल्याचे सांगितले.
advertisement
यानंतर सलमानला रिक्षामध्ये बसवून दोघेही त्याच्यासह जोगेश्वरीच्या दिशेने निघाले. इतर दोघेजण हे स्कुटीवर होते. दरम्यान, आरोपींपैकी एकाने ‘ACP अर्चना’ नावाच्या व्यक्तीला फोन करून कारवाई केल्याची माहिती दिल्याचा बनाव केला. काही अंतरावर गेल्यानंतर दसुऱ्या व्यक्तीने आणखी एकाला फोन लावत कारवाई झाली असून गाडी पाठवा असे सांगितले आणि फोन कट केला.
जोगेश्वरी येथे रिक्षा थांबवून आरोपींनी पैशांची बॅग स्वतःकडे ठेवली आणि सलमानला तिथून निघून जाण्यास सांगितले. घाबरलेल्या सलमानने तिथून निघून आपल्या मालकाला फोन करून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
