न्यूज१८ लोकमतच्या वतीने 'समृद्ध महाराष्ट्र' या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. न्यूज१८ लोकमतचे संपादक मंदार फणसे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
advertisement
"सगळे मराठी भाऊ आणि बहिण एकत्र चालणार आहे. ज्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आहे, ते सगळे एकत्र चालणार आहे. पण अर्थात दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. मराठी आणि मुंबईसाठी दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वाद कोणताच नाहीये. मला वाटतं एकत्र येणे हे महाराष्ट्राच मनात आहे. आम्ही असं निवडणुकीची वाट पाहून वैगेरे काही नव्हतो. भाजपने मुंबईची वाट लावली आहे. त्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत' असं आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं.
आदित्य ठाकरे यांच्या मुलाखतीतील मुद्दे
- आज राज्यात एक पक्ष दोन फुटी गटाचं सरकार आहे.समृद्धी महामार्गाचा एकफुटी पट्टाही सरळ नाही. महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात तुम्ही काय चांगलं केलत ते सांगा सगळ्यात घोळ आहे. लाडक्या बहिणींना म्हणता तुम्ही घोळ केला पण खात्यात पैसे तुम्ही टाकले होते. हे सरकार खरोखर जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे का, हे सरकार महाराष्ट्रासाठी भांडत आहे का? हा खरा प्रश्न आहे.
- महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण तुम्ही महाराष्ट्र हिताचं काही करतच नाही आहात. धारावी आम्ही मुंबईच्या हातून जाऊ देणार नाही. आमच्या भाषणांचं रील बनतो पण पुढे काय?
- माझा हिंदी सक्तीला विरोध आहे.प्रत्येकाला मातृभाषा आलीच पाहिजे त्या त्या राज्यात त्या भाषेचा आदर झालाच पाहिजे. तुम्ही सिंगापूरचं उदाहरण बघा.
- अटल बिहारी वाजपेयींना किती भाषा येत होत्या, नरसिंह राव यांना किती भाषा येत होत्या. मंत्र्यांनीही पहिलीपासून तीन भाषा शिकल्या आहेत का? घरी आमचं वातावरण मराठीच आहे माझ्या आतापर्यंतच्या बोलण्यात कुठे इंग्रजी आहे. माझं शाळांचं स्वप्न बंद पाडत आहेत. पण मी सत्तेत पुन्हा येऊन ते स्वप्न खरं करुन दाखवेन. आमच्याकडे निवडणुका कुठे होत आहेत. आम्ही जे एकत्र येत आहोत तो विषय खूप महत्त्वाचा आहे.
- 80 टक्के धारावीकर अपात्र का ठरलेत. कुंभारवाड्यातल्या लोकांना साडेबारा लाख देऊन जागा विकत घ्यावी लागेल.शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष, मनसे सगळ्या पक्षांनी एकत्र यावं. धारावीत बांग्लादेशी कुठून आले सरकार गेली अकरा वर्ष कुणाचं आहे.
- आता भाजपत जे आहेत ते सगळे इंम्पोर्ट आहेत. जी भाजप आधीची होती ती अजूनही तशीच आहे का याचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा.
- लोकांनी एकत्र येऊन ही दलदल स्वच्छ केली पाहिजे. पुढच्या पन्नास वर्षाचा कोण विचार करणार आहे. आम्ही लढत राहायचं आणि यांनी जमिनी लाटायच्या महाराष्ट्रात हे काय चाललं आहे. आमचं राजकारण लोकांसमोर राहिलेलं आहे आम्ही कधी हुडी घालून कुणाला भेटायला गेललो नाही.