पनवेलवरून थेट वसईला जाता येणार, 2710000000 रुपयांचा सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प
काही तासांपूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेने नोकरीबद्दल अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये 'गट- ब'मधील ऑफिसर पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. 10 सप्टेंबरपासून नोकरभरतीच्या अर्ज प्रक्रियेला सुरूवात होणार असून अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 30 सप्टेंबर असणार आहे. अर्जप्रक्रियेला सुरूवात 10 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजेपासून होणार आहे. अर्ज करण्याचा आणि परीक्षा फी भरण्याचा शेवटचा दिवस 30 सप्टेंबर असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्घतीने करू शकता. अर्जप्रक्रिया, अर्जाचे शुल्क आणि परीक्षा या तिनही गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
advertisement
नेव्ही अधिकाऱ्याच्या गणवेशात आला अन् रायफल घेऊन पसार, घटनेचा सीसीटीव्ही समोर
नोकरभरतीसाठी उमेदवारांना https://rbi.org.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जप्रक्रिया सुरू होताच लगेचच तात्काळ अर्ज भरावा. आरबीआयमध्ये ग्रेड बी पदांसाठी एकूण 120 जागांची भरती करणार आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. यामध्ये जनरल, DISM, DEPR विभागात ही भरती केली जाणार आहे. चांगली सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी तुमच्याकडे आहे. आरबीआय ग्रेड बी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी.
वय अवघे 19 वर्ष कमाई मात्र लाखात, बीडमधील शेतकरी नवीन पिढीसाठी ठरतोय आदर्श
इकोनॉमिक्स, फायनान्समध्ये मास्टर्स, पीजीडीएम किंवा एमबीए डिग्री प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३० वयोगटातील असावे. नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परिक्षेच्या माध्यमातून केले जाणार आहे. प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा होणार आहे.१८- १९ ऑक्टोबर या कालावधी फेज १ परीक्षा होणार आहे. त्यानंतर ६-७ डिसेंबर रोजी फेज २ परीक्षा होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी परीक्षेची तयारी करावी.
